You are currently viewing असलदे येथील सामाजिक कार्यकर्ते भगवान डामरे यांचे निधन..

असलदे येथील सामाजिक कार्यकर्ते भगवान डामरे यांचे निधन..

कणकवली :

असलदे येथील सामाजिक कार्यकर्ते,माजी भाजपा उपाध्यक्ष,आ.नितेश राणे यांचे खंदे समर्थक भगवान श्रीधर डामरे (वय-५३)यांचे अल्पशा आजाराने रविवारी पहाटे २.३० वाजता जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्याच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

भगवान डामरे हे सामाजिक कार्यात नेहमी आघाडीवर असायचे व चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून डॉक्टर व अन्य मित्रांच्या साथीने अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले होते. त्याचप्रमाणे भाजपा पक्ष संघटनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भव्य आरोग्य शिबीर भरवत सामान्यांना आरोग्य सेवा देण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले होते.त्याचप्रमाणे शैक्षणिक, सामाजिक,आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान होते. गावापासून ते मुंबई पर्यंत नागरिकांना आलेल्या समस्यांबाबत सातत्याने पाठपुरावा करून सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .
त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, मुलगी,बहीण असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा