You are currently viewing पदभार स्विकारताच पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दाखविली कार्यतत्परता

पदभार स्विकारताच पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दाखविली कार्यतत्परता

दोडामार्ग शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उतरले रस्त्यावर

दोडामार्ग

दोडामार्ग बाजारपेठेत वाहतुक कोंडी नित्याची असुन आज पुन्हा आठवडा बाजारादीवशी वाहतुक कोंडी दोडामार्ग वासियांनी अनुभवली यावेळी दोडामार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी व सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश ठाकूर , पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल पांगम यांसह पोलीस कर्मचारी यांनी वाहतुक कोंडी सोडवीली. यावेळी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या काही वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करुन दंड आकारण्यात आला.
पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी हे दोडामार्ग पोलीस ठाण्यात नुकतेच हजर झाले असून त्यांची कार्यतत्परता आज पहावयास मिळाली येणाऱ्या काळात दोडामार्ग तालुक्यातील अवैध धंदे तसेच गुन्हेगारी यावर आपली करडी नजर राहणार असून अवैध धंदेवाल्यांना त्यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा