चारचाकी गाडीची धडक बसल्याने पादचारी गंभीर

चारचाकी गाडीची धडक बसल्याने पादचारी गंभीर

सावंतवाडीतील घटना; चालकाचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला, नागरिकांनी दिला चोप…

सावंतवाडी

रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांला चारचाकीची धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले. हा अपघात आज सायंकाळी साडेतीन वाजण्याच्या सुमारास येथील चिटणीस नाका परिसरात घडला. दरम्यान संबंधित कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याठिकाणी असलेल्या नागरिकांनी त्याला अडवून चांगलाच चोप दिला. तर जखमीला अधिक उपचारासाठी येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित चार चाकी ही पुणे येथील पर्यटकांची होती. तर जखमी तरुण रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या त्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. यात ते उडून पुन्हा दुसर्‍या दुचाकी समोर आदळले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे तर संबंधित कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी त्याचा पाठलाग करत त्याला भररस्त्यात चोप दिला. व जखमीला रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. दरम्यान त्या ठिकाणी असलेले शिवसेनेचे शब्बीर मणियार यांनी त्यांना अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा