You are currently viewing कुडाळ दत्तनगरमधील वीज वाहिनीच्या कामाला सुरुवात..

कुडाळ दत्तनगरमधील वीज वाहिनीच्या कामाला सुरुवात..

कुडाळ

कुडाळ-नाबरवाडी ते दत्तनगर या नव्याने मंजूर ११ केव्ही वीज वाहिनीच्या कामाला गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली. या वीज वाहिनीमुळे तेथील स्थानिक नागरिकांचा विजेचा प्रश्न दूर होणार आहे. या वीज वाहिनीसाठी स्थानिक नगरसेविका श्रेया गवंडे यांनी पाठपुरावा केला होता.

दत्तनगरमधील रहिवाशांच्या मागणीची पूर्तता करत आ. वैभव नाईक यांनी नाबरवाडी ते दत्तनगरपर्यंत ११ केव्ही लाईन मंजूर करून दिलेले आश्वासन पूर्ण केले. या कामामुळे दत्तनगरमधील रहिवाशांची विजेची समस्या दूर होणार आहे. अशी माहिती स्थानिक नगरसेविका तथा न. पं. बांधकाम समिती सभापती श्रेया गवंडे यांनी दिली. या कामाचे भूमिपूजन आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ ग्रामस्थ रामदास यांच्या हस्ते करण्यात आले.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, वीज वितरणच्या शाखा अभियंता छाया परब, सामाजिक कार्यकर्ते राजू गवंडे, नगरसेविका श्रुती वर्दम, बाळा पावसकर, दत्तनगर मधील रहिवासी आनंद वालावलकर, विनायक पाटील व ठेकेदार प्रकाश पावसकर उपस्थित

प्रतिक्रिया व्यक्त करा