You are currently viewing मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या राधिका सोनाळकरची बॅडमिंटन मध्ये उल्लेखनीय कामगिरी

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या राधिका सोनाळकरची बॅडमिंटन मध्ये उल्लेखनीय कामगिरी

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या राधिका सोनाळकरची बॅडमिंटन मध्ये उल्लेखनीय कामगिरी

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स् इंग्लिश स्कूल सावंतवाडी या प्रशालेत इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थिनी कु.राधिका विश्वास सोनाळकर हिने सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन तर्फे आयोजित जिल्हा निवड चाचणी 2025 मध्ये आपले क्रीडा कौशल्य दाखवत उपविजेतेपद पटकावले
तिच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक श्री अॅडव्होकेट शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉक्टर श्री.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा