You are currently viewing वेंगुर्लेतील “त्या” कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणार…

वेंगुर्लेतील “त्या” कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणार…

मुख्याधिकाऱ्यांची ग्वाही; कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटीदरम्यान आश्वासन…

वेंगुर्ले

येथील नगर परिषद मधून कंत्राट संपल्याने अचानक कमी करण्यात आलेल्या कंत्राटी कामगारांना पुन्हा सेवेत घेण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करू, असे आश्वासन मुख्याधिकारी डाॅ. अमितकुमार सोंडगे यांनी आज येथे दिले. कंत्राटी कामगारांना पुन्हा सेवेत घेण्यात यावे यासाठी स्वतंत्र मुन्सिपल कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांची भेट घेतली. यावेळी या कर्मचाऱ्यांची उपासमार होऊ नये यासाठी सकारात्मक निर्णय घ्या, अशी मागणी सोंडगे यांच्याकडे करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा