You are currently viewing सुनील नारकर यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेचा विजेता केशवी कुसुर तर उपविजेता ठरला सत्यम प्रतिष्ठान

सुनील नारकर यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेचा विजेता केशवी कुसुर तर उपविजेता ठरला सत्यम प्रतिष्ठान

वैभववाडी

समाजसेवक सुनील नारकर यांच्या वाढदिवसानिमित्त भरविण्यात आलेल्या भव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेत स्पर्शिका बिल्डर्स चषक 2022 चा विजेता ठरला केशवी कुसुर संघ तर उपविजेता सत्यम प्रतिष्ठान भुईबावडा तसेच तृतीय पारितोषिक आजीवली तालुका राजापूर या संघाने पटकविला आहे. विजेत्या केशवी कुसुर संघाला उद्योजक रुपेश सावंत यांच्या हस्ते आकर्षक चषक व रोख रुपये तीस हजार देऊन गौरविण्यात आले.

उपविजेत्या संघाला आकर्षक चषक व रोख रक्कम वीस हजार रुपये देऊन गौरविण्यात आले तसेच तृतीय क्रमांकाच्या संघाला रोख रुपये दहा हजार व चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेमध्ये मालिकावीर होण्याचा मान केशवी कुसुर संघाचाओंकार थारळी याने पटकाविला. उत्कृष्ट फलंदाज सत्यम प्रतिष्ठानचा दिनेश मोरे तसेच उत्कृष्ट गोलंदाज कुसुर संघाचा योगेश साळुंखे तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक भडगाव कुडाळ संघाचा तुषार घाडीगावकर यांना आकर्षक चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला मोफत टी-शर्ट देण्यात आले. या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातील नामवंत संघाने सहभाग घेतला होता तीन दिवस चाललेल्या या भव्य अंडरम आर्म क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित होते श्री सुनील नारकर यांच्या वाढदिवसा दिवशी या स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरण समारंभ पार पडला यावेळी प्रसिद्ध समालोचक राजा सामंत यांनी समालोचक म्हणून काम पाहिले तर बक्षीस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन संदीप परटवलकर गुरुजी यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 2 =