You are currently viewing सावंतवाडी व कोलगाव परिसरातून दोन दुचाकींची चोरी

सावंतवाडी व कोलगाव परिसरातून दोन दुचाकींची चोरी

सावंतवाडी व कोलगाव परिसरातून दोन दुचाकींची चोरी

२४ तासांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी घटना; पोलिसांत गुन्हा नोंद

सावंतवाडी

सावंतवाडी शहर आणि कोलगाव परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. २१ एप्रिल रोजी सकाळी ९ ते २२ एप्रिल रोजी सकाळी ७ या कालावधीत या चोऱ्या झाल्या असून, याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुना शिरोडा नाका येथील रहिवासी जमाल खान यांची निळ्या-काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर प्रो (MH 07 V 0235) ही दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. तसेच कोलगाव-धुरीटेम येथील दयाल दाभोलकर यांची काळ्या रंगाची हिरो शाईन (MH 07 Z 1022) ही दुचाकीही चोरीला गेली आहे.
या दोन्ही घटनांमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात असून, पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा