वैभववाडी तालुक्यात नवीन ४ पॉझिटिव्ह रुग्णांची भर
वैभववाडी तालुक्यात नवीन ४ पॉझिटिव्ह रुग्णांची भर एकुण रुग्णसंख्या ५८ वर पोहोचली

वैभववाडी तालुक्यात नवीन ४ पॉझिटिव्ह रुग्णांची भर

वैभववाडी तालुक्यात नवीन ४ पॉझिटिव्ह रुग्णांची भर
एकुण रुग्णसंख्या ५८ वर पोहोचली

वैभववाडी प्रतिनिधी :-
वैभववाडी तालुक्‍यात दिवसेंदिवस कोरोना पाॕझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. रविवारी ४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असून एकूण रुग्ण संख्या ५८ वर पोहोचली आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनी दिली आहे.
रविवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार ६ पॉझिटिव्ह, ९ निगेटिव्ह तर ४ जण संशयित आहेत. त्या चार जणांचा अंतिम अहवाल लवकरच प्राप्त होईल असे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे. निगेटिव्ह असलेल्या व्यक्तींना घरी सोडण्यात येणार आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांवर सांगुळवाडी येथील कोव्हीड कक्षात उपचार करण्यात येणार आहेत.
त्याचबरोबर त्या चार जणांना अंतिम रिपोर्ट येईपर्यंत क्वारंटाईन कक्षात थांबावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सहा पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये करुळ व नावळे प्रत्येकी एक रुग्ण, शहरातील बँक दोन व इतर दोन यांचा समावेश असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा