You are currently viewing शिवसेना आमदार रमेश लटके यांचे दुबईत निधन

शिवसेना आमदार रमेश लटके यांचे दुबईत निधन

मुंबई :

अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार रमेश लटके यांचे दुबई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. मित्राला भेटण्यासाठी ते सहकुटुंब दुबईला गेले होते. लटके यांचे पार्थिव दुबईवरून मुंबईला आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत .1997 मध्ये पहिल्यांदा मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 2002 आणि 2009 च्या महापालिका निवडणुकीत सलग तीन वेळा त्यांनी नगरसेवक म्हणून कारकीर्द गाजवली. शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर रमेश लटके यांनी 2014 साली भाजपच्या सुनील यादव यांचा पराभव करत पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला. 2019 ला अपक्ष उमेदवार पटेल यांना पराभूत करत सलग दुसऱ्यांदा आमदार झाले होते.

लटके यांच्या निधनाची बातमी समजताच शिवसैनिक व चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. लटके यांचा समाजातील सर्व स्तरावरील नागरिकांची जवळचा परिचय होता. रमेश लटके यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या निधनामुळे एक लढवय्या शिवसैनिक प्रांजळ, अभ्यासू लोकप्रतिनिधी आपल्यातून निघून गेला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार रमेश लटके यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − 1 =