You are currently viewing ज्याचे हाती काठी त्याची म्हैस

ज्याचे हाती काठी त्याची म्हैस

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र, उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती, सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख

पूर्वजांची बरेच मार्मिक विचार सांगणारी महण आहे. म्हणजे समाजातील राजकीय सामाजिक . गुंडगिरी. सत्तेची भूक. मतदानातील गैरप्रकार आणि शासकीय निमशासकीय योजनांचा अपहार . आपल्या पदाच्या पक्षाच्या जोरावर गोरगरीब जनतेला. सर्वसामान्य जनता . यांना लुटणारे लुटारु आज प्रत्येक गावात आ वासून उभे आहेत. सर्वकाही आपल्या सत्तेच्या जोरावर बोगस कागदपत्रे आपले सगेसोयरे. बगलबच्चे यांची घर खिश भरण्यासाठी वापरणारे म्हणजे ज्याच्या हाती काठी म्हैस त्याचीच अशी परिस्थिती आज तयार झाली आहे
आज प्रत्येक गावात गोरगरीब लोक. वयोवृद्ध लोक. विधवा साठी विविध योजना. घरकुल योजना. संडास गोठे बांधणे. रस्ते गटर. स्मशानभूमी. समाजमंदिर. विविध आर्थिक विकास महामंडळ. विद्यार्थी साठी योजना. मुलींच्या साठी जिल्हा परिषद . पंचायत समिती. ग्रामपंचायत. नगरपालिका . महानगरपालिका. बांधकाम कामगार मंडळ. सार्वजनिक बांधकाम विभाग. समाजकल्याण विभाग. अल्पसंख्याक विभाग. आरक्षण मुद्दा. विविध घोटाळे . शेळी पालन घोटाळा. कुक्कुटपालन घोटाळा . महसूल लुट. रेशन घोटाळा भूखंड घोटाळा . अंगणवाडी अशा वर्कर मदतनीस पगार घोटाळा . विविध कल्याणकारी योजना वाटप घोटाळा . पाणीपुरवठा घोटाळा आरोग्य विभाग घोटाळा . स्वच्छता विभाग टेंडर घोटाळाः विविध कर आकारणी घोटाळा . निधी घोटाळा . विविध नावाने स्थापन विविध संस्था. सेवा सोसायटी. सुतगरणी यामधील लाखों रूपये घोटाळा भूखंड घोटाळा . अश्या विविध ठिकाणी राजकारणी लोकांनी आपल्या हातात काठी घेतली आहे . यांनी शासनाला महैसीचा दर्जा दिला आहे कारणं कोणतंही काम यांच्या विचाराशीवाय होतं नाही . राजकारणी आदेश देतात आणि त्यानुसार प्रशासन प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी गुलामी करत आहेत.
प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात . गावात. राजकारणी लोकांनी . सामाजिक प्रयोजन व लोकांना.तरूणाचया हाताला काम देतो असं आश्वासन देऊन गायरान. देवस्थान जमीन. ढापलया आणि त्यावर सुतगीरणी. सेवा सोसायटी. मजूर सोसायट्या. विविध कारखाने. आज बंद पडले आहेत. त्यांचे भुतं बंगल्यात रुपांतर झाले आहे . कोट्यवधी रुपयांची शासनाची बोगस कागदपत्रांच्या जोरावर लाटणारे हेच राजकारणी आहेत. संपत्ती १५० कोटी आणि कर्ज ४०० देणारे कोण होतें . म्हणजे ज्याच्या हातात काठी आहे म्हैस तयाचीच म्हणलं तर वावगे ठरणार नाही
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून बांधकाम कामगारांसाठी विविध . आर्थिक. शैक्षणिक. वैद्यकीय. अश्या विविध योजना राबविण्यात येतात त्यांचा लाभ घेण्यासाठी खरोखरच बांधकाम कामगार आहेत त्यांचे वय १८/५९ आहे ज्यांना इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार यांनी मान्यता नोंदणी दाखला दिला आहे असाच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला सभासद होऊ शकतो . पण आज ज्यांना कधीच बांधकाम कामगार जीवंत आहे कां ? मेला आहे? तो कसा जगतो ? पोटभर जेवन आहे कां? त्याला कामांवर असताना सुरक्षा आहे कां? बांधकाम कशाला म्हणतात? बांधकाम म्हणजे काय ? विट कशापासून तयार होते ? वाळू कूठून येते ? बांधकाम कामगार यांच्यासाठी कोणतं मंडळ आहे असतं? बोगस कामगार म्हणजे काय ? बांधकाम कामगार यांना जीवनावश्यक काय आहे ? दवाखान्यात. पंचायत समिती. जिल्हा परिषद. ग्रामपंचायत. नगरपालिका. महानगरपालिका. कामगार भवन. यामध्ये बांधकाम कामगार यांना सन्मानाची वागणूक अधिकारी व कर्मचारी देतात का ? बिगर लाच घेता यांचें कोणतेही काम होत कां ? राजकारणी आश्रय घेतलेल्या संघटना बांधकाम कामगार नोंदणीच्या नावाखाली कामगारांना लुटत आहेत याची कधी चौकशी केली का ? बांधकाम कामगार कामांवर असताना अपघात प्रमाण आज वाढले आहे. मयताचे लाभ .अंपगतव लाभ. असं लाभ त्यातील राजकीय संघटना मध्ये काम करणारे चोर यांनी किती पैसा उकळला आणि सायकल घेण्याची ऐपत नसणारे यांनी गाड्या . सोन्याची कड . स्थावर प्रापटी. जमीन जागा. घर . व्याजाचा व्यवसाय. गुंड पाळणे. कामगारांना धमकी देणे. या प्रकारांची कधीही राजकीय स़घटना वाले यांनी चौकशी केली कां? कामगार मेला तरी त्यांच्या मयताचे सुध्दा पैसे घेणारे राजकीय स़घटना वाले यांना कामगार मंत्री. राजकीय नेते .. पाठीशी घालत आहेत का? यांचा काय वाटा यामध्ये आहे कां ? बांधकाम कामगार यांना विविध कल्याणकारी योजना मिळवून देतो म्हणून आर्थिक लुटणारे राजकीय संघटनांचे पदाधिकारी व राजकीय नेते यांना या मिळकतीमधील किती रक्कम दिली जाते काय ? अश्या विविध माध्यमातून बांधकाम कामगार यांच्याशी काहीच संबंध नाही बांधकामाशी कोणताही संबंध नाही साधा भोळा. व्यसनी. गरजू. अडाणी . अश्या बांधकाम कामगारांना लुटण्यासाठी आज प्रत्येक नेत्याला बांधकाम कामगार यांचा पुळका आला आहे म्हणजे सत्ता यांची. संघटना यांची. लुटारु यांचेच. शासकीय निमशासकीय कामगार भवन मधील अधिकारी व कर्मचारी यांचेच याच ज्वलंत उदाहरण म्हणजे आज आपल्या सांगली जिल्ह्यात जवळपास दोन महिने झाले . बांधकाम कामगार यांच्यासाठी मंडळाकडून वाटप करण्यात येणारे सुरक्षा संच वाटप साहित्य संपले आहे असं कारणं सांगून बंद आहे . कामगार आपला रोजगार बुडवून हेलपाटे मारत आहेत. पण या बांधकाम कामगार यांना अजून सुद्धा सुरक्षा संच मिळाला नाही .पण एका राजकीय संघटनेने राजकीय वरदहसताखाली जिल्ह्यात दोन सुरक्षा संच वाटपाचे कार्यक्रम घेतलें मग यांच्यासाठी सुरक्षा संच आले कोठून कुणाला माहीत आहे का ? यासाठी सहहयक कामगार आयुक्त भवन मधील अधिकारी व कर्मचारी यांना सामिल आहेत कां? म्हणजे मी म्हणतो ते बरोबर आहे ज्याचे हातात काठी म्हैस त्याचीच हे खरं आहे.
बोगस बांधकाम कामगार नोंदणी आज सर्वात मोठा शाप आहे. आज राजकीय संघटना यांनी १०००/२०००/ घेऊन बांधकाम कामगार नोंदणी दाखले देणारे इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार नेमले आहेत यांनी तर कामगारांना लुटायला सुर धरला आहे . राजकीय नेत्यांचा वरदहस्त असले मुळे आज बोगस कामगार नोदणीला उत आला आहे.
कामगार सन्मान करण्याचे नवेच खुळ आज राजकीय संघटना नेते यांनी काढले आहे . कामगार खुळाच आहे. तो कायम अर्ध्या हळकुंडाने पिवळा होतो . त्याला बोलावले की तो येणार मग कोणीतरी नेता किंवा त्याचा बगलबच्चे आणायचे आणि आम्ही कामगारांसाठी घरकुल योजना मंजूर केली. मुलींच्या लग्नासाठी ५१ हजारांची योजना आम्हीच मंजूर करुन आणली. खरोखरच कामगार यांचीच नोंदणी आम्ही मोफत करतो आणि एका बाजूला यांनी नेमलेले पदाधिकारी १०००/१२०० रूपये घेवून कामगार नोंदणी करत आहेत . शासन बांधकाम कामगार यांचेसाठी विविध योजना राबवित आहे पण श्रेय घेऊन आपला उल्लू सरळ करणारे आपल्या समाजात आहेतच . यासाठी कारणीभूत आहेत ते म्हणजे आपल्या गावातील तालुक्यातील राज्यातील देशातील नेते व त्यांचे बगलबच्चे आहेत .
केंद्राकडून ई श्रम कार्ड ही योजना राबविण्यात आली. या योजनेचे ध्येय होतें की महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाल बांधकाम कामगारांसाठी निधी वर्ग केला जातो. आणि राज्य सरकार तो निधी किती सापेक्ष खरोखरच बांधकाम कामगार व अन्य लोकांना देत आहे ‌ राज्यात किती कामगार आहेत याचा सर्वे ई श्रम कार्ड मुळे केंद्राला कळणार आहे. म्हणून आज आपल्या गावात तालुका जिल्हा यामध्ये हे कार्ड काढण्याची जबाबदारी कोणतेही शासकीय निमशासकीय कार्यालये जबाबदारी म्हणून पार पाडत नाहीत. म्हणजे एवढ्या कारणावरून बांधकाम कामगार यांच्या ध्यानात यायलाच हवं काय आहे संघटनांचे षडयंत्र
बांधकाम कामगार यांनी कोणत्याही नेत्यांकडून सन्मान आपल्या योजनेचा लाभ घेताना फोटो काढू नका. आपला कमीपणा आपणच करुन घेऊ नका . आपल्याला कष्ट करायच माहिती आहे. नोंदणी साठी कोणत्याही संघटना सेवाभावी संस्था युनियन राजकीय सामाजिक स़घटना एजंट यांचेकडे जाऊ नका . सहहयक कामगार आयुक्त भवन मध्ये आपल्या मागणीला टाळाटाळ होत असेलतर जाब विचारा
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा