You are currently viewing बुद्ध पौर्णिमा

बुद्ध पौर्णिमा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*बुद्ध पौर्णिमा* 

 

*मानवी जीवनाच्या सर्वागीण उन्नतीसाठी जगाला शांतता, सहिष्णुतेचा संदेश देणारा गौतमबुद्ध म्हणजे विश्ववंदनीय ठरलेला महामानव*

 

समता, शांती, बंधुभाव, प्रज्ञा, शील, करुणा नि विवेकबुद्धीचा शाश्वत मार्ग मानवजातीला दाखविणारे गौतम बुद्ध.

बुद्ध पौर्णिमा वैशाख पौर्णिमेला साजरी केली जाते. ही तिथी वर्षातील सगळ्यात पवित्र आणि महत्त्वाची असते. बुद्ध पौर्णिमा आणखी तीन कारणांसाठी विशेष आहे ती म्हणजे याच दिवशी गौतम बुद्ध यांचा जन्म झाला. याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आणि याच दिवशी बुद्धांचं महानिर्वाण झालं…

बुद्ध ही ज्ञानाची उपाधी असल्याचे मानले जाते..बुद्ध शब्दाचा अर्थ आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी असा सांगितला जातो..

सिद्धार्थ शब्दाचा अर्थच सिद्ध आत्मा..

वैशाख पौर्णिमेला पाली भाषेत “वेसाक्को ” म्हणतात.. श्रीलंकेत बुद्ध पौर्णिमेला ‘”वेसाक”‘ असे म्हणतात. हा वैशाखचा अपभ्रंश आहे..

विविध देशांत या सणाचे वेगवेगळे नाव आहे… हाँगकाँगमध्ये याला “‘बुद्ध जन्मदिन’ म्हटले जाते इंडोनेशियामध्ये ‘”वैसक'” दिन म्हटले जाते.. सिंगापुरमध्ये ‘”वेसक दिवस”‘ तर थायलंडमध्ये ‘”वैशाख बुद्ध दिन'” म्हटले जाते… तर हिंदू धर्मात वैशाख पौर्णिमेला ‘”सत्यविनायक पौर्णिमा”’ म्हणूनही ओळखले जाते.. पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या मित्राला सुदाम्याला गरिबी व दु:खातून मुक्ती मिळवण्यासाठी सत्यविनायकाचा उपवास करण्यास सांगितले होते. तसेच या दिवशी धर्मराजाचीही पूजा केली जाते…

बुद्ध पौर्णिमा केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांत साजरी केली जातो. चीन, जपान, व्हिएतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे एकशे ऐंशी देशांतील बौद्ध धर्मीय हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात…

ज्ञानप्राप्तीनंतर बुद्धांनी दिलेल्या पहिल्या प्रवचनास ( उपदेश) “धम्मचक्रप्रवर्तक” किंवा धम्मचक्कपवत्तन असे म्हणतात..

बुद्धांनी आपली शिकवण पाली भाषेत दिली.. ती त्रिपिटीका मध्ये संकलित केलेली आहे.. त्रिपिटक तीन भागात आहे.. विनयपिटक, सुत्तपिटक व अभिधम्मपिटक… तसेच या पिटकांमध्येही अनेक उपग्रंथ आहेत..

गौतम बुद्ध हे ज्ञानाचे भांडार आहेत.

गौतम बुद्धांनी त्यांना मिळालेले ज्ञान समाजापर्यंत नेऊन एका वेगळ्याच बदलाची पायाभरणी केली होती. त्याकाळी समाजात माजलेलं अवडंबर, पशूबळी, नरबळींसह वैदिक कर्मकांड यांचा विरोध केला…मानव कल्याणाचा उपदेश केला.. लोकांमध्ये स्वर्ग आणि नर्क या भंपक गोष्टींबद्दलची असलेली भीती दूर करण्याचा प्रयत्नही केला… ते महान गुरू होते… मानवी जीवनातील दु:खे निवारण्यासाठी बुद्धांनी आठ मार्ग सांगितले ते म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी हे होय..

बुद्धांनी सांगितलेली चार आर्यसत्य व अष्टमार्ग हे जीवनोन्नतीचे सोपनच आहेत.. इतकचं नाही तर बुद्धांच्या हस्तमुद्रेतून जीवनातील विविध घटकांनाही दर्शविण्यात आले आहे…

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध भिक्षुक ठिकठिकाणचे बुद्ध विहार आणि मठांमध्ये एकत्र येऊन प्रार्थना करतात. बुद्ध मूर्तीसमोर दीप लावतात. प्राथनास्थळं रंगीबिरंगी पताक्यांनी सजवली जातात. बुद्धांची शिकवण आयुष्यात आणण्याचा संकल्प या दिवशी केला जातो.

बुद्धांनी मानवी कर्तृत्वावर जो विश्वास दाखविला तो इतका चिरंतन ठरला की जग आज त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत… सध्या कोरोनाच्या संकटाने जग हवालदिल झालेले असताना आज मानवी कर्तृत्वच कोरोनाचा पराभव करायला सिद्ध झालेले आहेत.. डॉक्टर, परिचारिका, पोलीस हे सारेच जण माणसातील देव जागृत करून कोरोनास तोंड देत आहेत. याच पार्श्वभूमीवर बुद्धांनी जो मानवी कर्तृत्वावर विश्वास दर्शविला त्याचे चिरंतनत्व परत-परत वेगळे सांगण्याची खरोखरच काही गरज आहे काय?

मानवी जीवन आनंददायी प्रसन्न सुंदर करण्यासाठी बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची जगाला आजही गरज आहे..

 

लेखक/ कवयित्री

संगीता कुलकर्णी– ठाणे

9870451020

प्रतिक्रिया व्यक्त करा