You are currently viewing कुडासे खुर्द येथे घरकुल डेमो हाऊसचे भूमिपूजन

कुडासे खुर्द येथे घरकुल डेमो हाऊसचे भूमिपूजन

दोडामार्ग

पाल पुनर्वसन गावठाण ग्रामपंचायत कुडासे खुर्द याच्या वतीने घरकुल योजना अंतर्गत प्रधान मंत्री आवास योजना तालुकास्तरीय डेमो ( प्रात्यक्षिक घरकुल ) घरकुल इमारतीचा शुभारंभ ग्रा.प.आवारात जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा माजी पंचायत समिती सदस्य बाबुराव धुरी  यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी बोलताना बाबूराव धूरी यांनी विविध विकास कामे व गावातील प्रलंबित कामाची माहिती जाणून घेतली त्यानंतर श्री धुरी यांनी सांगितले की, ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांनी मागणी केल्याप्रमाणे वेळोवेळी पुनर्वसन गावात विकास कामासाठी निधि दिला आहे भविष्यात व्यायामशाळा मजूर करणे व ग्रामपंचायत इमारत, विस्तारीकरण निधीची मागणी पूर्ण करण्यात येइल ग्रामपंचायत विस्तारीकरण करण्यासाठी 03 लाख रुपये
जिल्हा नियोजन समितीतून मजूर करण्यात येतील असेही जिल्हा नियोजन समिती सदस्य बाबुराव धुरी यांनी आश्वासनं दिले.

यावेळी अनेक विषयावर ग्रा प सदस्य यांनी चर्चा केली यावेळी सरपंच सौ संगीता देसाई सदस्य उमेश नाईक सदस्या संजना सावंत कुडासे येथील सामजिक कार्यकर्ते रामदास मेस्त्री संदेश राणे राजाराम देसाई ठेकेदार जंगले ग्रामसेविका ज्योती डोगरदिवे संगणक ऑपरेटर मंजुषा घोगळे श्री माणिकराव देसाई व अन्य ग्रामस्थ उपस्थीत होते

प्रतिक्रिया व्यक्त करा