You are currently viewing माणगाव खोऱ्यातील सार्वजनिक बांधकामास शिवसेनेचा घेराव…

माणगाव खोऱ्यातील सार्वजनिक बांधकामास शिवसेनेचा घेराव…

कुडाळ :

माणगाव खोऱ्यातील पुळास गावातील साकव गेली 3 वर्ष कंत्राटदारानी अपूर्ण अवस्थेत ठेवलेला. यासंदर्भात पुळास गावातील लोकांनी शिवसेनेच्या वतीने घेराव घालण्यात आला. यावेळी कंत्राटदार वर कारवाई करावी. तसेच काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली. आ. वैभव नाईक यांच्या सूचनेनुसार बांधकाम विभागाच्या जाधव मॅडम यांनी त्वरित कारवाई करून प्रत्यक्ष कामास सुरवात करण्याचे आदेश दिले. याकरिता ग्रामस्थांनी जाधव मॅडम यांचे आभार मानले. यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी व पुळास ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + fifteen =