You are currently viewing कणकवली तहसील कार्यालयातील आधार केंद्र सुरु….

कणकवली तहसील कार्यालयातील आधार केंद्र सुरु….

राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ

कणकवली
कणकवली तालुक्यातील नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. आज तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार सुर्यकांत गवस यांच्या हस्ते फित कापून व राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आधार केंद्राच्या शुभारंभ करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी सरचिटणीस रुपेश जाधव, कणकवलीत विधान सभा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, संदेश मयेकर, रविभूषण लाड, महा. ई. सेवा व्यवस्थापक प्रसाद जाधव, कणकवली मंडळ अधिकारी राजेश नागावकर, तलाठी श्रीमती कोरगावकर, ग्रामसेवक स्वरा जाधव, रविकिरण सावंत, विनायक गुरव आदी उपस्थित होते.

कणकवली तालुक्यातील नागरिकांसाठी आधार अपडेट व नवीन आधार करण्याकरता कणकवली शहरात बऱ्याच महिन्यांपासून आधार केंद्रे बंद होती. अखेर विदर्भ कोकण ग्रामीण बँक येथे आधार केंद्र सुरु करण्यात आले आहे. तसेच कणकवली तहसील कार्यालयातही आधार केंद्र सुरु करण्यात आले आहे. हे आधार आठवड्यातुन दोन दिवस असून मंगळावर व शुक्रवार या दिवशी असणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − thirteen =