You are currently viewing ॲड. परिमल नाईक यांच्या कार्यालयास युवराजांची सदिच्छा भेट !

ॲड. परिमल नाईक यांच्या कार्यालयास युवराजांची सदिच्छा भेट !

विकासाच्या व्हिजनवर झाली चर्चा ; सुधीर आडिवरेकर, उदय नाईक यांची उपस्थिती !

सावंतवाडी :

नुकतेच भाजपवासी झालेले सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी माजी आरोग्य सभापती ॲड. परिमल नाईक यांच्या सालईवाडा येथील कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी युवराज लखमराजे यांच माजी आरोग्य सभापती ॲड. परिमल नाईक, माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, माजी पाणी पुरवठा सभापती उदय नाईक, विद्यार्थी उपाध्यक्ष गोविंद प्रभू यांनी भेटवस्तू देत स्वागत केल. यावेळी ॲड. परिमल नाईक यांनी राजघराण्याशी असलेल्या त्यांच्या ऋणाबंधांबद्दलच्या आठवणी जागृत केल्या. तर आगामी नगरपरिष निवडणूकीच्या पार्श्वभूमीसह शहरातील विकासाच्या व्हिजनबद्दल सखोल चर्चा झाली. शहरातील हॉस्पिटल, पर्यटन, मोती तलाव संवर्धन आदिसह विविध विषयांवर युवराज लखमराजे यांच्याशी चर्चा करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा