You are currently viewing वीज अधिकाऱ्याला राष्ट्रवादीचा शॉक….

वीज अधिकाऱ्याला राष्ट्रवादीचा शॉक….

सावंतवाडी :

नोटीस न देता गोरगरिबांच्या वस्तीत जाऊन वीज कनेक्शन कट करणाऱ्या अधिकाऱ्याला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी धारेवर धरल. पैसे भरण्यास मुदत देण्याची विनंती करून देखील ग्राहकांशी उन्मत्तपणे वागणाऱ्या महावितरणचे अधिकारी बागलकर यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच शॉक दिला. तर ग्राहकांना अपमानास्पद वागणून दिल्याने आक्रमक झालेल्या पुंडलिक दळवी यांनी त्या अधिकाऱ्याचे कान उपटले. वीज कनेक्शन कट करण्याचे आदेश दाखवण्याची मागणी केली. यावेळी महावितरणच्या त्या अधिकाऱ्याची तारांबळ उडाली. दोन महिन्यापूर्वीच महावितरण कंपनीच आलेल पत्र दाखवत सारवासारव करण्याचा केविलवाणा प्रयत्न महावितरणचे अधिकारी बागलकर यांनी केला. शासनाकडून आलेल पत्र आपल्याजवळ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल. मात्र, संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना जाब विचारला. दरम्यान, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली. यानंतर लाखेवस्तीतील ग्राहकांनी टप्प्याटप्यान रक्कम अदा करण्याच आश्वासन महावितरणला दिल. यानंतर मोलमजुरी करणाऱ्या या ग्राहकांचे वीज क्नेक्ल्शन पूर्ववत करण्यात आल. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, हिदायतुल्ला खान, जावेद शेख, आसिफ शेख, आशिष कदम, नियाज शेख, संतोष जोईल, राजू धारपवार आदि उपस्थित होते. तर लाखेवस्तीतील वीज क्नेक्शनं तोडल्याच समजताच शिवसेना नेते शब्बीर मणियार यांनी देखील महावितरणला धडक देत जाब विचारला.

प्रतिक्रिया व्यक्त करा