You are currently viewing खारेपाटण येथे अपघातात दोघे गंभीर जखमी…

खारेपाटण येथे अपघातात दोघे गंभीर जखमी…

कार आणि दुचाकीत अपघात; अधिक उपचारासाठी आरोग्य केंद्रात हलवले…

कणकवली

मुंबई-गोवा महामार्गावरील खारेपाटण रामेश्वर नगर येथे काल रात्री आठच्या सुमारास कार आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. यात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी ओरोस येथे हलविण्यात आले आहे. शेर्पे गावातील महेंद्र शेलार वय ५० आणि दिपक नमसे वय ५५ अशी त्या दोघा जखमींची नावे आहेत.
कणकवलीहून मुंबईच्या दिशेने कार निघाली होती. रामेश्वर नगर येथील दुभाजकावरून दुचाकीवरून पलीकडे जात असताना कारची दुचाकीला धडक बसली. यात दुचाकीवरील दोघे रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दुचाकीवरील दोघा जखमींना खारेपाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी ओरोस येथे पाठविण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three − one =