You are currently viewing कोलाहल

कोलाहल

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी जगन्नाथ खराटे यांचा समाजप्रबोधनपर लेख

सुट्टीचा दिवस होता.जरा बाजारात जाऊन येवुया असं मनाशी ठरवुन बाहेर पडलो.अन् बाजारात जाऊन पोहचलो.जिकडे तिकडे खरेदीविक्री सुरू होती,ग्राहक अन् विक्रेत्यांमध्ये व्यवहारात घासाघीस सुरु होती अन् सर्विकडे खरेदीविक्रीची जिवघेणी स्पर्धा सुरू होती.अन एक प्रकारचा कोलाहलंच सुरु होता.. अगदी शांती ती नव्हतींच.खरं तर घरांत असताना थोडी तरी शांती होती. पन्,घरातुन बाहेर पडल्यानंतर शांतता हरवुनंच गेली होती…
जगांत सद्ध्या हेंच चित्र दिसत आहे.. जिकडे बघावं तिकडे नुसता कोलाहलंच दिसत आहे..अन् ह्याला कुठलंही ताळतंत्र नसतं.ना कसले नितिनियम, ना कसलं बंधनं.मग ते कुठलंही क्षेत्र असो.सर्वत्र कोलाहलाचं रांन माजलं आहे..
जगात अशा अनेक गोष्टी आहेत की तिथं एक नितिनियमा़ंच्या सिमारेखा आखुन दिल्या आहे, बंधन आहे,काही तरतुदी आहेत….
मानव हा जन्माला आला तेव्हा तो अगदी रानटी अवस्थेत होता,ना कुठले नियम ना कसली बंधनं.अगदी एक अस्ताव्यस्त अशा कोलाहलात तो वाढला,अन् तसांच वागला.पन् हळूहळू वैदिक काळांत आर्यांनी स़पुर्ण मानवी जीवनात शांतताप्रिय अशा आचार, विचार,अन् उच्चाराची सुत्रबद्ध सुसंस्कृत जिवनशैली प्रदान केली.अन्, आत्मकल्यानाचा मार्ग दाखवला,अन्, ह्या अशांततामय कोलाहलापासुन मुक्ति मिळवुन दिली..
मधल्या काळात अनेक संस्कृती, अनेक पंथ उदयास आले,अन् रानटी मानुस हा देवत्वाच्या दिशेने वाटचाल करु लागला.मग तो हळूहळू ज्ञान विज्ञानाचा हात धरुन नश्वर जगांत ईश्वराला शोधु लागला..
पन्, हे सर्व करीत असतांना तो अगदी मनःशांती हरवुन कामक्रोधादि षडरिपुंच्या कोलाहलात ईतका अडकुन पडला की, तो आपल्या मुळ ईश्वरी रुपाला विसरला.अन् विज्ञानाच्या बळावर स्वःतालाच ह्या स्रुष्टिचा रचेता किंवा संहारकर्ता समजु लागला, सद्ध्या तर तो टेस्टट्यूब बेबी ते संहारक, अन्वस्र अशा शोधातुन स्वतः जनक समजुन जन्म म्रुत्यवर हुकुमत गाजवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे.
सद्ध्या जगाचं हे अगदी विद्रुप चित्र दिसुन येत आहे‌.अगदी जन्मदात्या मातापित्यांच्या सुखदुःखाशी मुलाला कसंही कर्तव्य नाही असं वागु लागला आहे,,अन् हेंच वातावरण सर्व ठिकाणी आहे,काहीअपवाद वगळता,राजकारण ते समाजकारण ह्या क्षेत्रात ईतका कोलाहल माजला आहे की, जनतेच्या खिशातल्या पैशावर डल्ला मारुन आपला स्वार्थ साधण्याची स्पर्धांच लागली आहे, काही अपवाद वगळता, अगदी वैद्यकीय, शिक्षण,साहित्य,कला संस्कृती अशा पवित्र क्षेत्रातही ह्या स्वार्थाच्या कोलाहलाने सर्वसामान्य जनतेला त्रासुन सोडले आहे, अन् ह्या कोलाहलाच्या आगींत स्वार्थी आपली पोळी भाजुन घेऊन सातपिढृयांची कमाई करुन घेत आहेत.अन् हे सर्व आंधळ्या न्यायदेवतेसमोर घडतं आहे त्यामुळे हा न्याय कोण करील हा जनतेपुढे नेहमीचाच यक्षप्रश्न आहे..

असं,हे सारं सहन केल्याशिवाय मार्गच नाही.कारण,कलियुगाचा काळ असल्याने सत्याला ह्या अग्णिपरिक्षेला समोर गेल्याशिवाय गत्यंतर नाही. शेवटी एकंच म्हणावं लागेल ‌.अन ते म्हणजे…
“”कालाय तस्मै नमः””

जगन्नाथ खराटे–ठाणे…
दि–११मे२०२२

प्रतिक्रिया व्यक्त करा