You are currently viewing कठपुतली

कठपुतली

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवीजगन्नाथ खराटे यांचा अप्रतिम समाजप्रबोधन लेख..*

*(झरोका)*

३)…

*कठपुतली..*

तेव्हा अगदी लहान होतो. दुसरीत असेन, गावची शाळा अन् गावाचं ते निसर्गरम्य बालपनातलं सुख..जर, धरनीवर स्वर्गिय सुख अनुभवायचं असेल तर ते फक्त बालपणातंच अनुभवता येतं..
अन् ते अनुभवताना,अगदी वेगळ्या अशा स्वर्गिय विश्वात आहोत असा भास होतो.. आशा निराशेचा स्पर्शही झाला नसतो तेव्हा.. अन्, म्हणूनंच त्या बालपणाला “रम्य ते बालपण” असं म्हणतात..अशा बालपणीच्या असंख्य सुखमय,आठवणी उराशी बाळगून आपन पुढे वाटचाल करीत असतो..
तर अशा बालपणीच्या आठवणीमधली ही एक ,शाळेतली आठवण सहजपणे लक्षात राहीली आहे…
तेव्हा आमच्या शाळेत, बाहेरुन हरहुन्नरी कलाकार येवुन कार्यक्रम करायचे,अन् त्या कलाकाराला, प्रत्येक मुलं “पाच, दहा पैशाची” वर्गणी जमा करुन गुरुजीकंडे देत असु..
तर एकदा शाळेत मुलांच्या मनोरंजनासाठी,” कठपुतलीवाला” आला अन त्यानं, पडद्याचं सुंदर स्टेज बनवून तो, छानपैकी बाहुल्यांचा खेळ करु लागला.त्या स्टेजवर, त्या निर्जीव बाहुल्या चित्रपटातील गाण्यांच्या तालावर सुंदर नाच करीत होत्या.. अगदी मंत्रमुग्ध होऊन आम्ही मुलं पाहंत होतो,जादु झाल्यागत त्या बाहुल्या हावभाव करुन नाचंत होत्या. घंटाभरांत कार्यक्रम संपला अन् आम्ही घरी आलो..
पन् मला सतत एकंच प्रश्न सतावत होता की कारण ह्या निर्जीव बाहुल्या कशा काय नाचंत होत्या? ह्याबद्दल आईला विचारलं ..आई म्हणाली ,”अरे त्या बाहुल्याना,तो “कठपुतलीवाला” पडद्याच्या पाठीमागे उभा राहुन नाचवतो.. तिनं त्याबद्दल सर्व काही सांगीतलं…..
बालवयात ते समजंत नव्हतं.पन आता मोठं झाल्यावर सर्व काही समजायला लागलं..अन् मनात विचार आला, खरच..
ह्या.जगांत जे काही घडतं ते आपोआप घडत नाही,त्या पाठीमागे कुणाचा तरी हात असायलाच हवा. निसर्गाच्या ह्या घटना घडतात. ऊन पाऊस, वारा, हे सारं घडविण्यासाठी कुणीतरी “कठपुतलीवाला” किंवा “सुत्रधार” अवश्य असलांच पाहिजे..

हे सारं जग म्हणजे”कठपुतलीसारखंच” आहे,आपल्या हातुन जे काही भलं वाईट होतं, ते आपोआप तर होतंच नाही..आपल्या पाठीमागे कुणीतरी “कठपुतलीवाला” असेलच ना?आपन तर निव्वळ बोलविते धनी आहोत..
अन् हे अगदी खरंच आहे.. कारण हृया जगात जे काही घडतं किंवा घडवलं जातं त्यामागे कुठलीतरी शक्ती आहे अन् म्हणून आपल्या हातुन भलेबुरं कार्य घडतं…
आपन कधी कुणाला मदत करतो, कुणासाठी वेळ देतो.कुणावर प्रेम करतो अन् कुणालाही दुःख होवु नये त्यासाठी सदैव जागरुक असतो. हे सर्व भल्या किंवा चांगल्या गोष्टी आहेत..
पन् कधी कधी, आपल्या हातुन वाईट गोष्टी घडत असतात.. कुणाला अपशब्द बोलले जातात, कुणावर रागावतो.कुणाला लुबाडत़ो तर कधी कधी वाईट सवयीच्या आहारी जावुन आपन स्वतःचं अन आपल्या बायका पोरांचं आयुष्य उध्वस्त करतो.. ह्या सर्व वाईट गोष्टी आपल्याकडुन घडतात..
अन् हृयाचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात.. हृयाला काय कारण आहे?? ह्यासाठी कोण कारणीभूत आहे.. जर हे भलं बुरं ईतर कुणी शक्ती करंत असेल तर दंड तिला मिळाला पाहिजे ना!!असं सहजच वाटुन जातं..
हे, तर अगदी बरोबर,पन् तसं होत नाही…
हृया जगात दोन शक्ती आहे त्याम्हणजे दैवी अन् असुरी.. किंवा सत्गुण अन्, दुर्गुण.. सत्गुण हे दैवी किंवा चांगली शक्ती अन् दुर्गुण ही असुरी किंवा वाईट शक्ती समजली जाते….
तसं बघायला गेलं तर शक्ती ही चांगली किंवा वाईट नसते ती चैतन्यदायी ऊर्जा असते,अन्, आपन तिचा जसा उपयोग करु तशी ती कार्य करते,.‌तिचा सकारात्मक उपयोगकेला तर चांगलं कार्य घडुन चांगलं फळ मिळेल अन् नकारात्मक ऊपयोग केला तर वाईट कार्य घडुन वाईट फळ मिळते..
ज्याप्रमाणे,आग किंवा अग्णी ह्याचा सत्कारणी उपयोग करुन जेवन बनवलं तर आपलं पोट भरुन आयुष्य आनंदमय होतं,अन् त्यांच आगीचा नकारात्मक उपयोग करुन,आपन जाळुन घेतलं तर आपला नाश हा ठरलेलाच आहे आहे..
ह्यासाठी आपन जरी कठपुतली असलो तरी,आपल्यापाठीशी असनार्या शक्तीचा उपयोग करण्यासाठी” सद्विवेकबुद्धी”वापरायला हवी….
अन्. नेमकं हेच आपन विसरतो.. सद्ध्या जगात हेच घडतं आहे.. मानव हा आपल्याकडील शक्तिचा उपयोग कसा करावा हे विसरून गेला आहे.. क्षणीक सुखासाठी इतरांच्या सुखाशी, दुःखाशी काही घेणेदेणे नाही असा वागु लागला आहे.दुर्गुणांच्या मदतीने कसंही करुन इतरांना खड्ड्यात ढकलून त्याच्या जवळचं हिसकावून किंवा कपटानं,आपल्या ताटात घ्यायचं हींच प्रवृत्ती वाढली आहे..
खरं तर सर्व जग ही विधात्याने बनवलेल्या अनेक कठपुतल्या आहेत.. अन्, अंतरात असलेल्या चैतन्यमय शक्तीने कार्य करित असतात.. मग ते चांगलं असो वा वाईट..
पन् ह्या ८४लक्षयोनीतील देहधारया कठपुतल्यापैकी फक्तं ..मानवी कठपुतलीलांच कर्मस्वातंत्र्य बहाल केल्यामुळे ते स्वयंचलीत होवून भलंबुरं कर्म करुन स्वतः भल्याबुरया फळांची हक्कदार बनते..हे मनुष्याने लक्षात घ्यायला हवं…

जगन्नाथ खराटे– ठाणे
दि-२५एप्रील २२

प्रतिक्रिया व्यक्त करा