You are currently viewing मालवण नगरपालिकेच्या नव्या अग्निशमन बंबाचे उद्या लोकार्पण

मालवण नगरपालिकेच्या नव्या अग्निशमन बंबाचे उद्या लोकार्पण

मालवण

मालवण नगरपालिकेचा अग्निशमन बंब नादुरुस्त होऊन निर्लेखीत केल्यानंतर गेले दीड दोन वर्षे शहारत अग्निशमन बंब नसल्याने आगीच्या घटनेवेळी नागरिकांची गैरसोय होत होती.. मात्र आता नगरपालिकेत नव्याने अग्निशमन बंब दाखल होत असून या नव्या अग्निशमन बंब वाहनाचे उद्या गुरुवार दि. १२ मे रोजी सायंकाळी ४ वाजता मालवण नगरपरिषद येथे आम. वैभव नाईक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा