You are currently viewing नांदगाव पाटीलवाडी येथे भरधाव कारची पिकअप शेडला धडक

नांदगाव पाटीलवाडी येथे भरधाव कारची पिकअप शेडला धडक

नांदगाव पाटीलवाडी येथे भरधाव कारची पिकअप शेडला धडक

बसस्टॉप मधील एक काॅलेज युवती गंभीर जखमी…

कणकवली

मुंबई गोवा महामार्गावर क्र. 66 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव पाटीलवाडी येथे भरधाव कार चालकाचा कार वरील नियंत्रण सुटल्याने थेट येथील दत्तमंदिर बस स्टॉपला धडक देत कार महामार्गावर विरूद्ध दिशेने पटली झाली तर बसस्टॉप जमिनदोस्त होत नुकसान झाले.या अपघातात बसस्टॉप मधील एक काॅलेज युवती गंभीर जखमी झाली असून इतरांनी प्रसंगावधान बाळगून बाहेर आल्याने मोठा अपघात टळला.सदरचा अपघात सकाळी ८:३० च्या सुमारास घडला.

कु. प्रेरणा राजेंद्र तांबे,वय 18, रा. नांदगाव बोध्दवाडी ही नेहमी प्रमाणे कणकवली येथे काॅलेजला जाण्यासाठी नांदगाव पाटीलवाडी येथील दत्तमंदिर बसस्टॉपवर मुंबई गोवा हायवेवर बसली होती. यादरम्यान रत्नागिरी वरून गोव्याच्या दिशेने जाणारे स्विफ्ट कार चालक श्री. निनाद सुभाष शिरदनकर हे जात असताना नांदगाव पाटीलवाडी येथे आले असता त्याचा कारवरील ताबा सुटल्याने त्याची कार थेट बसस्टॉपमध्ये घुसली. यानंतर बसस्टॉप कोसळून जमिनदोस्त होत कार गोव्याच्या दिशेने जात असताना पुन्हा पलटी होत रत्नागिरीच्या दिशेने तोंड होत एका बाजूस पलटी झाली. या अपघातात बसस्टॉप मधील कु. प्रेरणा हीच्या पायाला गंभीर दुखापत झाली तर बाकी प्रवासी तेथून बाजूला जाण्यास यशस्वी झाले अन्यथा मोठा अपघात झाला असता.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत मदतकार्य करीत जखमी कु. प्रेरणा हीला कणकवली येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी कणकवली पोलीस चंद्रकांत माने व इतर घटनास्थळी दाखल होत प्राथमिक माहिती घेत पंचनामा केला तर सरपंच रविराज मोरजकर, हायवे पोलीसासह ग्रामस्थांनी वाहतूक सुरळीत करण्यास मदतकार्य केले. दरम्यान या ठाकाणी बसस्टॉपला हा हायवेच्या लेनला लागूनच असल्याने बस ही हायवेवरच थांबत प्रवासी बसत असतात यामुळे बसस्टॉपबाबत वारंवार तक्रारी देऊनही प्रश्न मार्गी न लागल्याने ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला. अपघाताचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा