You are currently viewing नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था सिंधुदूर्गच्या वतीने श्री जयंतीदेवी सांस्कृतिक, कला क्रीडा मंडळाचा पर्यावरण प्रेमी म्हणून सन्मान

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था सिंधुदूर्गच्या वतीने श्री जयंतीदेवी सांस्कृतिक, कला क्रीडा मंडळाचा पर्यावरण प्रेमी म्हणून सन्मान

कुडाळ :

 

रविवारी मराठा हॉल कुडाळ येथे सामाजिक काम, वृक्षारोपन, आरोग्य, सांस्कृतिक, कला क्रीडा, शैक्षणिक धडपड करणाऱ्या मालवण तालुक्यातील पळसंबच्या श्री जंयतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचा नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था सिधुदूर्ग यांच्या वतीने गुणगौरव सन्मानचिन्ह व तुळशीच रोप देऊन गौरविण्यात आले.

हा सन्मान स्विकारण्यासाठी पळसंब देवस्थानचे मानकरी श्री. श्रीप्रकाश कापडी, सामाजिक कार्यकत्ये श्री. प्रमोद सावंत व मंडळाचे अध्यक्ष श्री. उल्हास सावंत, सचिव श्री. चंद्रकांत गोलतकर, श्री. अमित पुजारे, श्री. हितेश सावंत, श्री . शेखर पुजारे, श्री रुपेश पुजारे, अनुज गोलतकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा