You are currently viewing मानव बिबट्या संघर्ष निवारण समितीवर प्रश्नचिन्ह!!!!!

मानव बिबट्या संघर्ष निवारण समितीवर प्रश्नचिन्ह!!!!!

पुणे

राज्यातील मानव बिबट्या संघर्ष निवारण समितीवर टीका होऊ लागली आहे. बिबट्यांची समस्या हाताळण्यात काम न केलेल्या अननुभवी सदस्यांची नियुक्ती केली आहे. तज्ज्ञांचा अभाव असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. तरी या समितीची पुनर्रचना करण्याची मागणी होऊ लागली आहे.

 

राज्यात बिबट्यांसह वन्यजीव आणि मानव संघर्ष समस्या अधिक तीव्र होऊ लागली आहे. या संघर्षात मानवासह वन्यजीवांचा देखील बळी जाऊ लागला आहे. ही समस्या ग्रामिण भागांसह पुणे, नाशिक, मुंबईसह विविध शहरांमध्ये जाणवू लागली आहे. भविष्यात या समस्येचे उग्र रुप धारण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

 

या समस्येच्या निवारणासह त्यावर उपाययोजना करण्यासाठी महसुल व वन विभागाने मुंबई पश्‍चिम विभागाच्या वन्यजीव विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यांच्या अभ्यास गटाची स्थापना केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा