You are currently viewing युवासेना कुडाळ तालुका आयोजित विद्यार्थ्यांसाठी “युवामित्र संकल्पना”

युवासेना कुडाळ तालुका आयोजित विद्यार्थ्यांसाठी “युवामित्र संकल्पना”

दर मंगळवारी आणि बुधवारी कुडाळ तहसिल कार्यालय येथे सकाळी १० ते दुपारी 1 वाजेपर्यंत..

कुडाळ :

युवासेना कुडाळ तालुक्याच्या वतीने खास. विनायक राऊत, आम. वैभव नाईक, युवासेना विस्तारक अमित पेडणेकर, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली युवामित्र ही संकल्पना पुन्हा एकदा सुरू करण्यात येत आहे. युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांच्या नेतृत्वाखाली तसेच भुपेश चेंदवणकर, गोट्या चव्हाण यांच्या सहकार्याने ही *युवामित्र* संकल्पना कुडाळ तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरू करत आहे.

‘युवामित्र’ या संकल्पनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या दाखल्यासाठी मदत करणार आहे. तालुक्यातील विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन युवासेना शहरप्रमुख संदिप म्हाडेश्वर, युवासेना शहर समन्वयक श्री अमित राणे यांनी केले आहे.

दर मंगळवारी आणि बुधवारी कुडाळ तहसिल कार्यालय येथे सकाळी १० ते दुपारी 1 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी भुपेश चेंदवणकर – ९४२२९८०००४, गोट्या चव्हाण – ९५१८९४३८४७ यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा