You are currently viewing मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपा सज्ज

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपा सज्ज

*राष्ट्रीय सहसंघटन मंत्र्यांच्या उपस्थितीत झाली महत्वपूर्ण बैठक*

*आम.नितेश राणे यांच्यावर दिली विशेष जबाबदारी*

कणकवली :

भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी यांच्या अध्यक्षतेखाली,भाजपाच्या मुंबई महानगरपालिका निवडणुक कोअर कमेटीची आज बैठक झाली.मुंबईत वसंत स्मृती कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत आगामी होणाऱ्या मुंबई महानगरपालिका निडणुकीच्या अनुषंगाने  विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.मुंबई महापालिकेसाठी भाजपने मोर्चे बांधणी सुरू केली आहे.त्यात आमदार नितेश राणे यांच्यावर  दक्षिण-मध्य मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे.

आज झालेल्या या बैठकीसाठी मुंबई भाजपा प्रेदश अध्यक्ष मंगलप्रभात लोढा,विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, माजीमंत्री, आमदार आशिष शेलार,खासदार गोपाळ शेट्टी,खासदार पूनम महाजन,आम.अतुल भातखळकर,आम.कालिदास कोळमकर,आम.नितेश राणे,आम.सुनील राणे,आम.अमित साटम,आम.प्रसाद लाड,मनोज कोटक,प्रवक्ते संजय उपाध्याय,आदी सह भाजपाचे प्रमुख नेते उपस्थित होते.यावेळी मुंबई महापालिकेच्या २८८ प्रभागांमध्ये आगामी निवडणुकीच्या दृष्टीने काय रणनीती असावी? कोणत्या नेत्यांवर काय जबाबदारी द्यावी? या संदर्भातील चर्चा झाली.भारतीय जनता पार्टी महानगरपालिका निवडणूक  जिंकण्यासाठी एक्शन मोडवर आलेली पहावयास मिळत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + 9 =