You are currently viewing सेन्सेक्स २३२ अंकांनी वधारला, तर निफ्टीने गाठला १९,६००चा टप्पा

सेन्सेक्स २३२ अंकांनी वधारला, तर निफ्टीने गाठला १९,६००चा टप्पा

*सेन्सेक्स २३२ अंकांनी वधारला, तर निफ्टीने गाठला १९,६००चा टप्पा*

*गुंतवणूकदारांना १.२५ लाख कोटी रुपयांचा नफा*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजार हिरवा झाला होता. सोमवारी बीएसई सेन्सेक्स २३२ अंकांनी वाढून ६५,९५३ अंकांवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीही ८१ अंकांनी वाढून १९,५९८ वर बंद झाला. देशांतर्गत शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी हिरव्या रंगात रंगला. आयटी आणि फार्मा क्षेत्रातील समभागांमुळे बाजाराला बळ मिळाले. बाजाराच्या या तेजीमध्ये गुंतवणूकदारांना सुमारे १.२५ लाख कोटी रुपयांचा नफा झाला. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप ३०५.३५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. यापूर्वी, ४ ऑगस्ट रोजी बाजार बंद असताना, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३०४.१६ लाख कोटी रुपये होते.

दिवीस लॅबोरेटरी, महिंद्रा, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, एलटीआयमाईंडट्री, अदानी पोर्ट हे निफ्टीमध्ये आघाडीवर आहेत. तर निफ्टीमध्ये ब्रिटानिया इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अॅक्सिस बँक ह्यांचे सर्वाधिक नुकसान झाले.

फार्मा आणि आयटी निर्देशांक १ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. त्याच वेळी, रिअल्टी निर्देशांक ०.५ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. मात्र, पीएसयु बँक निर्देशांक ०.६ टक्क्यांनी घसरला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × three =