You are currently viewing अखिल गुरव संघटना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख पदी अंकुश बाबाजी गुरव यांची निवड..

अखिल गुरव संघटना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख पदी अंकुश बाबाजी गुरव यांची निवड..

कुडाळ :

अखिल गुरव समाज संघटना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुखपदी घोडगे सोनवडे गावच्या अंकुश बाबाजी गुरव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संजय सावंत, महिला जिल्हाध्यक्षा सायली संतोष गुरव यांच्या शिफाफशीनुसार ही निवड करण्यात आली आहे. अंकुश गुरव हे मूळचे सोनवडे (घोटगे) गावचे रहिवासी असून अभ्युदयनगर काळाचौकी येथे स्थित आहेत. सोनवडे ग्रामविकास मंडळाचे मागील 7 वर्षे ते अध्यक्ष असून या मंडळामार्फत मागील 35 वर्षे विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम मुंबई सह गावीसुद्धा राबवले जातात.मुंबईत खाजगी शिपिंग कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत असलेले अंकुश गुरव हे नेहमीच ज्ञातीबांधवांसाठी सहकार्याला पुढे असतात. अभ्युदयनगर काळाचौकी शिवसेना शाखा क्र.205 चे उपशाखाप्रमुख असलेल्या अंकुश गुरव यांचा मुंबईसह मूळ गाव सोनवडे घोटगे सह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येथे नेहमीच सामाजिक कार्यात पुढे असतात. गोर गरीब जनतेचे ते आधारवड आहेत. गुरव समाजाच्या उन्नती साठी ते नेहमी पुढे असतात. शिवसेना पक्षाच्या माध्यमातून त्यांचे मुंबई येथे मोठे कार्य असून राजकीय धार्मिक सामाजिक कला क्रीडा क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. हा निवडीनंतर बोलताना अंकुश बाबाजी गुरव म्हणाले माझ्या समाजासाठी, समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांच्या सहकार्याने मिळालेल्या पदाचा उपयोग करून माझा समाज पुढे नेण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन. माझ्या समाज बांधवांसाठी मी 24 तास उपलब्ध असून त्यांचे सर्वांगीण हित जोपासण्याचा माझा प्रयत्न राहील. त्यांच्या या निवडीबद्दल राजकीय सामाजिक, घोडगे सोनवडे ग्रामस्थ तसेच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 4 =