You are currently viewing सहकार खात्यातून निवृत्त न्यायाधीश, वकील,चार्टर्ड अकाऊंटंट यांनी अर्ज करण्याचे आवाहन

सहकार खात्यातून निवृत्त न्यायाधीश, वकील,चार्टर्ड अकाऊंटंट यांनी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी / प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी अर्ज सहकार खात्यातून निवृत्त झालेले अधिकारी (वयाची 70 वर्ष पूर्ण न झालेल्या), निवृत्त न्यायाधीश, वकील (सनद प्राप्त), चार्टर्ड अकाऊंटंट यांचेकडून अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती माणिक सांगळे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अधिकारी यांनी दिली आहे.

          अजाचे विहीत नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व अधिनस्त सर्व तालुका उपनिबंधक, सहायक निबंधक, सह संस्था यांचे कार्यालयात दि 11 मे  ते 10 जून  या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील.

          अर्जासोबत खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडण्यात यावीत. आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी पुरावा, जन्मतारीख पुरावा, शैक्षणिक अर्हतेसंबंधी कागदपत्रे (पदवी प्रमाणपत्र) वकील असल्यास बार कौन्सिल सर्टिफिकेट जोडावे. अनुभवासंदर्भात आवश्यक कागदपत्रे इ. याबाबतची जाहीर सूचना कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. असे ही श्री. माणिक सांगळे यांनी कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा