You are currently viewing संविता आश्रमच्या उपक्रमांतर्गंत डिगस माध्यमिक विद्यालयात प्रेम, आकर्षण आणि वासना विषयावर कार्यशाळा

संविता आश्रमच्या उपक्रमांतर्गंत डिगस माध्यमिक विद्यालयात प्रेम, आकर्षण आणि वासना विषयावर कार्यशाळा

कुडाळ

कुडाळ येथील डिगस माध्यमिक विद्यालयात प्रेम, आकर्षण आणि वासना या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. संविता आश्रमच्या खास उपक्रमा अंतर्गत ही कार्यशाळा घेण्यात आली. सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रूपेश पाटकर यांनी या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अलिकडे सोशल मिडियातून अनोळखी व्यक्तींचा संपर्क वाढत असून, यातून फसवणूकीच्या, लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. यामुळे कुमारवयातील मुलांनी स्वतःला या सर्वांपासून कसे सावरावे कोणती काळजी घ्यावी याबाबत डॉ. रूपेश पाटकर यांनी मार्गदर्शन केलं.

या कार्यशाळेत डॉ. पाटकर मुलांशी संवाद साधला. मुलांनीही त्यांच्या मनातील प्रश्न उत्स्फूर्तपणे विचारत डॉक्टरांशी संवाद साधला. अनेक उदाहरणे,खेळ आणि प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा आनंद लुटला. अनेक उदाहरणे देत डॉ. रूपेश पाटकर यांनी प्रेम, आकर्षण आणि वासना यातील फरक समजावून सांगितला. मित्र मैत्रिणींच्या दबावामुळे या वयात पडलेलं चुकीचं पाऊल पुढील आयुष्य कसं उध्वस्त करू हे डॉ. रूपेश पाटकर यांनी मुलांना उदाहरणे देत समजावून सांगितले.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक आळवे सर, संविता आश्रमचे महाबळेश्वर कामत, विद्यालयाचे शिक्षिक राणे, शिक्षिका सावंत तसेच अन्य शिक्षक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा