You are currently viewing किंजवडे विकास सोसायटी चेअरमन पदी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर

किंजवडे विकास सोसायटी चेअरमन पदी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर

उपाध्यक्षपदी भाजपचे संतोष किंजवडेकर निवडी बिनविरोध

देवगड

किंजवडे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष किरण टेंबुलकर तर व्हॉईस चेअरमनपदी भाजपचे संतोष किंजवडेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या सेवा सोसायटी निवडणुकीत महाविकास आघाडीचे ८ व भाजपचे ५ सदस्य विजयी झाले होते.

यात महाविकास आघाडीचे किरण हरिशचंद्र टेंबुलकर,संजय पांडुरंग आचरेकर,अरविंद बाळकृष्ण भोगले,सदानंद विष्णू जेठे,संदीप सुंदर कदम,विजय रामचंद्र सुर्वे,सुनील काशीराम कदम,(आनूसुचित जाती),वंदना विजय घाडी (महिला)तर भाजपचे संतोष मनोहर किंजवडेकर,मंगेश सखाराम सुर्वे,विलास शंकर बगाड,शाहू बापू वरक,(भटक्या विमुक्त)सरिता काशीराम तळवडेकर(महिला)हे सर्व सदस्य बिनविरोध विजयी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा