You are currently viewing वरळीकरांच्या जीवांची ससेहोलपट कधी थांबणार?

वरळीकरांच्या जीवांची ससेहोलपट कधी थांबणार?

*वरळीकरांच्या जीवांची ससेहोलपट कधी थांबणार?*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

वरळी येथील पोदार वैद्यकीय महाविद्यालयातील एक २२ वर्षीय विद्यार्थी २६ एप्रिल, २०२३ रोजी रुग्णालयाच्या आवारातील झाडावरुन पडून गंभीर जखमी झाला, त्याला अत्यावश्यक असलेले वैद्यकीय उपचार वेळीच न मिळाल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तत्पूर्वी नोव्हेंबर, २०२१ मध्ये वरळी बी.डी.डी. चाळ परिसरातील केशव आळी या कामगार वस्तीमध्ये झालेल्या घरगुती गॅस सिलिंडरच्या स्फोटात चार महिन्यांच्या बालकासह एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर जखमी कुटुंबाला वेळीच उपचार न मिळाल्यामुळे ही दुर्दैवी व हृदयद्रावक घटना घडली. या कोवळ्या बालकाचा मृत्यू माणुसकीला काळीमा फासणारा आणि शासन-प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींची असंवेदनशीलता व अनास्था चव्हाट्यावर मांडणारा आहे.

आजचे धकाधकीचे जीवन आणि बदललेली जीवनशैली, यामुळे सर्वांनाच विविध आजारांनी ग्रासलेले आहे. यात हृदयविकार आणि तत्सम घातक अशा अन्य आजारांचा समावेश आहे. अशा आजारांमध्ये तातडीच्या व अत्याधुनिक वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते.

ऐतिहासिक संदर्भ असलेल्या जुन्या बी.डी.डी. व अन्य चाळी आणि झोपडपट्टया असलेल्या मुंबईतील वरळी विभागात कामगार आणि मध्यमवर्गीय नागरिक मोठ्या प्रमाणावर राहतात. वरळीकरांना तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी वरळीतील पोदार रुग्णालय; परळ येथील के.ई.एम. रुग्णालय किंवा मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयांत न्यावे लागते. तथापि, पोदार रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि सुविधा नसल्यामुळे, सदर रुग्णाला नायर किंवा के.ई.एम रुग्णालयात नेण्याचा सल्ला तेथील डॉक्टर देतात. ही दोन्ही रुग्णालये दूर, तसेच नेहमीच वाहतुकीची कोंडी असलेल्या विभागात असल्यामुळे, रुग्णालयात नेण्यापूर्वीच वाटेत किंवा वेळेवर पोहचू न शकल्यामुळे रुग्णालयात त्या अत्यवस्थ रुग्णाचा मृत्यू होतो, हे विदारक सत्य आहे. वेळीच वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे, आतापर्यंत वरळीतील शेकडो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

इंग्रज १९४७ साली देश सोडून गेले, तेव्हा त्यांनी मुंबईकरांसाठी बांधलेली शासकीय रुग्णालये आजही रुग्णसेवेत कार्यरत आहेत. मात्र, स्वातंत्र्यानंतर किती नव्या शासकीय रुग्णालयाची यात भर पडली आहे, हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. त्यावेळी मुंबई भौगोलिकदृष्ट्या फक्त सायन आणि माहिमपर्यंत मर्यादित होती आणि लोकसंख्या सुमारे दोन-अडीच लाखांच्या आसपास होती. आता, पनवेल, कल्याण आणि विरारपर्यंत मुंबई विस्तारली असून, लोकसंख्या जवळपास सव्वा कोटी इतकी आहे.

वरळीतील नागरिकांच्या जीवाची होत असलेली हेळसांड थांबवण्यासाठी, अत्यवस्थ रुग्णांना पोदार रुग्णालयात तातडीच्या व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी वरळी बी.डी.डी. चाळ क्र. १ मधील शांती वैभव बुध्द विहार, नवतरुण क्रीडा मंडळ व माता रमाई महिला प्रेरणा मंडळ या संस्थेच्या वतीने गेली चार वर्षे राज्य शासन-प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे निवेदने देऊन पाठपुरावा केला जात आहे. वरळी विभागात जनजागृती मार्च; पोदार रुग्णालयाच्या आवारात निदर्शने; सह्यांची मोहिम तसेच महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनप्रसंगी वरळी ते विधानभवन अशी मूक पदयात्रा काढून विविध प्रकारे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्याचाही या प्रयत्न केला. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही, हे खेदजनक आहे. वरळीकरांच्या या जिव्हाळ्याच्या मागणीवर जर कार्यवाही झाली असती, तर कदाचित या जखमींचे प्राण वाचू शकले असते.

वरळीकरांच्या जीवन-मरणाशी संबंधित ही समस्या अतिशय गंभीर असून, मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करुन पोदार रुग्णालयात अत्यावश्यक व अत्याधुनिक वैद्यकीय उपचार होतील, अशी सुयोग्य व्यवस्था उपलब्ध व्हावी आणि वरळीकरांच्या जीवांची होत असलेली ही ससेहोलपट थांबावी हीच अपेक्षा असल्याचे रजनीश कांबळे यांनी सांगितले.

 

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 3 =