You are currently viewing देवबाग डिंगेवाडीत शॉर्टसर्किटने आग लागून घर बेचिराख…

देवबाग डिंगेवाडीत शॉर्टसर्किटने आग लागून घर बेचिराख…

सुमारे आठ लाखांचे नुकसान घरातील सर्व साहित्य जळाले

मालवण

देवबाग डिंगेवाडी येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत जुजे फर्नाडिस यांचे घर जळून खाक झाले . यात घरातील सर्व साहित्य जळल्याने सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे . ही घटना सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली . देवबाग डिंगेवाडी येथे विद्युत खांबावर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आगीची ठिणगी शेजारच्या जुजे फर्नाडिस यांच्या घरावर पडली . सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आग भडकली . यात फर्नाडिस यांच्या घरातील सर्व साहित्य जळाले . आग लागल्याचे समजताच घरातील मंडळींनी तसेच स्थानिकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले . मात्र आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले . आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू होते . कुडाळ येथून आलेल्या अग्निशमन बंबाच्या सहायाने आगीवर नियंत्रण मिळविण्यास उशिराने यश मिळाले . या आगीत फर्नांडिस कुटुंबियांचे सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा