You are currently viewing अवजड वाहतुकीसाठी आंबोली घाट बद करा…

अवजड वाहतुकीसाठी आंबोली घाट बद करा…

सावंतवाडी तालुका राष्ट्रवादीकडून सा. बा. विभागाला निवेदन सादर

सावंतवाडी

अवजड वाहतुकीसाठी आंबोली घाट बंद करण्यात यावा अशी मागणी सावंतवाडी तालुका राष्ट्रवादीच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंता सौ. अनामिका चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे.
पावसाळा तोंडावर आला आहे मोठ्या प्रमाणात घाटातून अवजड वाहतूक होत असल्यामुळे घाट खचण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे याबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घेण्यात यावा असे पदाधिकाऱ्यांच्या म्हणणे आहे.
याबाबत आज त्यांनी चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली तशा आशयाचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा