You are currently viewing गोवा येथे समुद्रात बुडून सावंतवाडीतील युवकाचा मृत्यू…

गोवा येथे समुद्रात बुडून सावंतवाडीतील युवकाचा मृत्यू…

सावंतवाडी

मडगाव येथील समुद्रात बुडल्याने सावंतवाडी सबनिसवाडा येथील २२ वर्षीय युवकाचे निधन झाले आहे. ही घटना काल सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. लौकीक विलास सातार्डेकर असे त्याचे नाव आहे.तो पर्वरी गोवा येथे शिक्षण घेत होता. आज दुपार पर्यत त्याचा मृतदेह सबनिसवाडा येथील घरी आणण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की, सावंतवाडी येथे राहणारा लौकीक हा आर्ट महाविद्यालयाच्या शिक्षणासाठी गोवा पर्वरी येथे राहत होता. काल तो आपल्या चार मित्रा समवेत कांदोलीम बीचवर मौजमजा करण्यासाठी गेला होता. मात्र समुद्रात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो त्या ठीकाणी बुडला. त्यांनतर उशिरा त्याचा मृतदेह आढळून आला.आज दुपार पर्यत त्याचा मृतदेह सबनिसवाडा येथील घरी आणण्यात येणार आहे. त्यानंतर उपरलकर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. असे त्यांच्या निकटवर्तीयांकडुन सांगण्यात आले. बीएसएनएल मध्ये केबलचे काम करणार्‍या विलास सातार्डेकर यांचा तो एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अशा अपघाती जाण्याने सबनिसवाडा परिसरात शोककळा पसरली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा