You are currently viewing कुडाळ नगरपंचायत व मालवण नगरपरिषदेसाठी पुन्हा एकदा २ कोटी ८८ लाख रु निधी मंजूर

कुडाळ नगरपंचायत व मालवण नगरपरिषदेसाठी पुन्हा एकदा २ कोटी ८८ लाख रु निधी मंजूर

आ. वैभव नाईक यांनी नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे पुन्हा एकदा नगरविकास विभागामार्फत कुडाळ नगरपंचायत व मालवण नगरपरिषदेसाठी एकूण २ कोटी ८८ लाख रु निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजेनेअंतर्गत कुडाळ नगरपंचायतीसाठी ५३ लाख तर वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मालवण नगरपरिषदेसाठी २ कोटी ३५ लाख रु. निधी विविध कामांसाठी मंजूर झाला आहे. याबाबतचे शासन निर्णय १२ एप्रिल २०२२ रोजी निर्गमित करण्यात आले आहेत.

यामध्ये कुडाळ नगरपंचायत हद्दीतील कुडाळ बाजारपेठ वाचनालय ते उदय नाडकर्णी घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी १३ लाख रु, कुडाळ शहरातील विठ्ठलवाडी (पशुवैद्यकीय चिकित्सालय ) समोर गटार बांधणे व आरसीसी लाद्या टाकणे, तसेच कुडाळ क्रिडांगण येथे समालोचनासाठी शेड बांधणे यासाठी निधी ४० लाख, हि कामे मंजूर करण्यात आली आहेत.
तर मालवण नगरपरिषदेमध्ये मत्स्यालय प्रकल्प उभारणी करणे निधी १ कोटी २० लाख, मालवण नगरपरिषद मच्छीमार्केट येथे सुसज्ज प्रसाधनगृह बांधणे निधी २५ लाख, मालवण भरड पे पार्क येथे विकसित करण्यात येणाऱ्या वाहनतळाच्या जागेत सुसज्ज चेंजिंग रूम्स व आवश्यक सोयी सुविधा तयार करणे २० लाख, रेवतळे शाळा जंक्शन ते मांजरेकर घर ते गाड घरापर्यंत रस्ता मजबुतीकरण करणे व अंतर्गत गटार बांधकाम करणे ३० लाख, मालवण समुद्र किनाऱ्यावर पर्यटक सुविधांकरिता गझीबो उभारणे ४० लाख असे एकूण २ कोटी ८८ लाख रु निधी मंजूर करण्यात आला आहे. मागणी केल्यानंतर ना. एकनाथ शिंदे यांनी तातडीने हा निधी दिल्याबद्दल आ. वैभव नाईक यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा