You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यातील नवाबाग वाडी तील मच्छिमारांची शासनाच्या विरोधात उपोषणाची नोटीस

वेंगुर्ले तालुक्यातील नवाबाग वाडी तील मच्छिमारांची शासनाच्या विरोधात उपोषणाची नोटीस

“वायु” चक्रिवादळाची नुकसान भरपाई न मिळाल्याने उपोषणाची नोटीस

मच्छिमार बांधवाच्या उपोषणास भाजपा वेंगुर्ले चा पाठींबा –
प्रसंन्ना ऊर्फ बाळु देसाई, जिल्हा सरचिटणीस, भाजपा सिंधुदुर्ग

वेंगुर्ले
दिनांक ११ जुन २०१९ रोजी झालेल्या “वायु” चक्रिवादळामुळे वेंगुर्ले तालुक्यातील नवाबाग वाडी तील आठ मच्छिमारांची जाळी वाहुन जाऊन हजारो रुपयांचे नुकसान झाले होते .
त्यावेळी मत्स्यविभागाचे अधिकारी व महसूल चे अधिकारी यांनी नवाबाग वाडी मध्ये जाऊन पंचनामा करून नुकसानीची पंचयादी केली होती. तसेच नुकसानीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवीलेला होता. परंतु अद्याप त्यांना शासनाकडून कोणतीही नुकसान भरपाई मीळाली नाही. परंतु त्यानंतर झालेल्या “कायर” चक्रिवादळाची नुकसान भरपाई शासनाने मंजूर केली परंतु त्यापूर्वी झालेल्या “वायु” वादळाची नुकसान भरपाई शासनाने मंजूर केली नाही .
ज्यावेळी “वायु” चक्रिवादळामुळे मच्छिमारांची जाळी वाहुन गेली होती त्यावेळी तात्कालिन पालकमंत्री दिपकभाई केसरकर यांनी नवाबाग वाडी मध्ये येऊन पहाणी करुन शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देईन असे आश्वासन दिले होते. परंतु दीड वर्ष होऊनही अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने नाईलाजाने २६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी, वेंगुर्ले श्री.जोशी यांना दिले.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर, नवाबाग बुथप्रमुख प्रकाश मोटे, इच्छाराम मालवणकर, शामसुंदर कोळंबकर, दत्ताराम कोळंबकर, मुकुंद खडपकर, देवेंद्र तांडेल इत्यादी नुकसानग्रस्त मच्छिमार उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती माहितीसाठी तहसीलदार – वेंगुर्ले व पोलिस निरीक्षक – वेंगुर्ले यांना देण्यात आल्या .

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − seven =