You are currently viewing मन माझे

मन माझे

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरविंद ढवळीकर यांची अप्रतिम काव्यरचना

आजवरी पडले गळा अंतरीचे ओझे
भार सोसवेना भाळा थके मन माझे
कुणी सांगती मज बाळा
हीच जीवनाची शाळा
खडू सुख दुःख फळा विटे मन माझे
उभा जन्म एकच चाळा
केले उगा सारे गोळा
हाच जाहला घोटाळा चुके मन माझे
पडे विसर दैवें सगळा
संत संग बरवा भोळा
पूर्व संचिताच्या खेळा भुले मन माझे
गुरु कृपेचा सोहळा
याची देही याची डोळा
श्वास अंतरी मोकळा घेई मन माझे
पाय लागले देऊळा
काय भिणे कळिकाळा
चंद्रभागेत खळाळा भिजे मन माझे
सोडी विचार सोवळा
पाप पुण्याचा वेगळा
बांधी पंढरी सांवळा विठू मन माझे

अरविंद
9960267354
24/9/20

प्रतिक्रिया व्यक्त करा