You are currently viewing “श्री महाराजांच्या पादुका स्थापना तपपूर्ती सोहळा”

“श्री महाराजांच्या पादुका स्थापना तपपूर्ती सोहळा”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार श्री.अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”श्री महाराजांच्या पादुका स्थापना तपपूर्ती सोहळा”* (जांभिवली. ता कर्जत, जि.रायगड)

 

ब्रह्मचैतन्यांच्या पादुका झाल्या स्थापन

तपपूर्ती सोहळा आज होत संपन्न।।धृ।।

 

पादुका आणल्या हत्तर्गी गावांहून

जांभिवली आल्या गोंदवले पूजा होऊन

तपा पूर्वी स्थापिल्या श्रीमहाराजांच्या इच्छेनं।।1।।

 

पादुकांत नऊ नद्यांचे जल हनुमान

महाराजांचे गादीचा कापूस मणी रत्न

गोंदवले पंचांचे शुभहस्ते स्थानापन्न।।2।।

 

सेवेकरी करतात नित्य पूजा अर्चन

पौर्णिमेला होते काकड आरती संपन्न

रामरक्षा रामपाठ सायंपुजा होते नेमानं।।3।।

 

प्रतिवर्षी होते नाम शिबीर संपन्न

भक्त जमती मोदे घेती नाम समजून

उत्साहे होत भजन प्रवचन कीर्तन।।4।।

 

प्रति वर्षी होतो महाराजांचा जन्मदिन

पालखीपुढे रांगोळ्या काढती होते भजन

सुवासिनी ओवाळती श्रींना गावची शान।।5।।

 

नाम शिबिरात सहभागी होती सर्वजण

तृप्त होती अल्पोपहार प्रसाद मिळून

श्रींचे आशीर्वादे सोहळा होई संपन्न।।6।।

 

श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677

प्रतिक्रिया व्यक्त करा