You are currently viewing जल बाजार

जल बाजार

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश आंदोलन समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख

“” पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिलादो लगे उस जैसा “” पाणी अमृत आहे “” पाणी अडवा पाणी जिरवा “” पाणी अमूल्य आहे “” थेंब थेंब वाचवा देश वाचवा “” अश्या विविध माध्यमातून पाण्याची महती सांगितली जाते. पाणी म्हणजे जीवन आहे सर्व जनजीवन निसर्ग झाडं झुडपे अश्या सर्वांना जीवनदान देण्याचे काम पाणी करतं असतं
पूर्वी खळखळून वाहणारे ओढे. तुडुंब भरून वाहणारी नदी. नदीत वाळूत झरे काढून पाणी पिण्याचा अनुभव वेगळाच असतो . पण हे सर्व कालबाह्य झाले आहे. वाढती लोकसंख्या वाढती घराची मागणी त्यामुळे लोकानी जंगल. गावरान जमीन. नैसर्गिक नाले. अश्या विविध ठिकाणी अतिक्रमण केले यामुळे पूर्वी मोठं मोठ्या नद्या ओढे यांना आज नाल्याचे स्वरुप आले . नैसर्गिक नाले तर चोरीला गेले. याची पोचपावती म्हणून वाढत्या लोकसंख्येमुळे वाढते औद्योगिकीकरण यांमुळे सांडपाणी . केमिकल मिश्रित पाणी. विविध ठीकाणचे पाणी जमीनीत मोठ्या प्रमाणात मुरायला सुरवात झाली . यामुळे लोकांना पिण्यासाठी अयोग्य पाणी मिळायला सुरुवात झाली. शेतीत सुरू असायचा प्रकार झाला आधुनिक खते. किटकनाशक. तणनाशक. विविध पिकांच्या रोगांची औषध फवारणी मोठ्या प्रमाणात झाली. आणि हेच सर्व जमीनीत मुरून पाण्याचा जमीनीतील स्तर दुषित झाला.
मलेरिया. काविळ. पोटाचे आजार. केसांची समस्या. दातांचे व हाडांचे आजार. असे विविध पाण्यापासून होणारें आजार लोकांना होण्यास सुरुवात झाली . तरिसुधदा आपल्या वागण्यात जीवनशैलीत कांहीच बदल झाला नाही . यासाठी प्रशासनाने आपली जबाबदारी म्हणून आणि लोकांचे जीवन सुखी समृद्ध व्हावे यासाठी ग्रामीण भागात ग्रामपंचायत आणि शहरी भागात नगरपालिका महानगरपालिका यांनी जल शुद्धीकरण प्रकल्प प्रत्येक पाणी पुरवठा करणार्या पाण्याच्या टाक्या यांच्याजवळ केली. त्यामुळे लोकांना शासनाच्या नियमानुसार स्वच्छ जल अभियान अंतर्गत पाणीपुरवठा होणयास सुरुवात झाली. स्वस्थ जल अभियान. अश्या विविध स्वच्छ जल पुरवठा कराणारया शासनाच्या योजना लोकांच्या साठी अमलात आणल्या यामुळे लोकांना स्वच्छ आणि शुध्द पाणी मिळणयास सुरुवात झाली. पण दुषित पाण्याची समस्या.पाऊसाचे पाणी. संडास बाथरुम पाणी. केमिकल पाणी. यामुळे आजही जल स्तर दुषित आहे. यासाठी दुसरे कोण दोषी नाही आपणच दोषी आहोत. आणि यामुळेच आपणांस आज निसर्गाची अनमोल देणगी अमृत जे आपणास पृथ्वी चे पोटातून फुकट कोणताही मोबदला निसर्गाने आपणाकडून न घेता आपणास दिला आहे तो आज आपणांस आपले आरोग्य टिकविण्यासाठी पाणी आज विकत घेण्याची गरज आली आहे .
दुषित पाणी म्हणजे कुजलेले एका डबक्यात असणारं पाणी.किटक किड असणारे पाणी. शेवाळे जमा होणारे पाणी. खारट चव असणारं पाणी. एक विशिष्ट असा उग्र वास येणारे पाणी. पाऊसाळयात गढूळ माती मिश्रित पाणी. असे विविध माध्यमातून पाणी दुषित पिण्यास अयोग्य असते. जागोजागी पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाकडून घेण्यात आलेल्या एकाही बोअरवेलला पिण्यास योग्य पाणी लागत नाही कारणं सर्वत्र घाण पाणी जमीनीत मुरत असतं
लोकांचे जीवन हित ध्यानात घेऊन आज सर्वत्र अॅकवा. बिसलरि. जल गंगा. जल जीवन. स्वस्थ जल. अश्या विविध नावाने जागोजागी आज ग्रामीण भागात शहरी भागात पाणी विक्री जोरात चालू आहे . यासाठी एक ठराविक पाणी शुद्धीकरण प्रकल्प बसविला जातो . हे शुध्द आणि स्वच्छ पाण्याच्या नावाखाली पाण्याची विक्री करणारे यासाठी कोणते व कसल्या दर्जाचे पाणी वापरलं जातं हे पाणी बाटलीत पॅकिंग केलेलं असतं बाहेरून पाणी काचगत दिसत म्हणून आपणं कोणतेही चौकशी न करता हे पाणी केव्हा पॅकिंग केल गेल होत. पाणी शुध्दीकरण करतांना काय आणि कोणती पाऊडर केमिकल जे मानवाच्या आरोग्यास योग्य आहे असं होत का? आज गाव वाड्या वस्त्या तालुका जिल्हा राज्य पूर्ण देशांत लोक एक वेगळेपणा आणि टेटस दाखविण्यासाठी बाटलीतील पाणी पितात पण त्यांना तरी कशी खात्री असते कि हे पाणी स्वच्छ आणि स्वस्थ आहे याचं काय प्रमाण आहे. यांवर असणारा आय एस ओ मानांकन बोगस तर नाही. याचा काय पुरावा आहे. त्या बाटलीतील पाण्याचा दर्जा टेस्ट कोण आणि केंव्हा करत त्याचा रिपोर्ट त्या त्या पाणी ए टी एम वर लावला आहे कां? आपणं तो कधी चेक केला आहे कां ?
अन्न व औषध प्रशासन विभागाकडे या गल्ली बोळात असणारे पाणी विक्रेते यांची नोंद असते का? त्याची तपासणी पडताळणी अन्न व औषध प्रशासन करत काय ? त्यासाठी काय नियम आहे कां? अश्या पाणी विक्री करणारे यांची ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका मध्ये गावात शहरात असणारे पाणी विक्री करणारे यांच्या दुकानाचे नाव. लायन्स. पाणी कोणत वापरलं जातं शुध्दीकरण करतांना केमिकल पाऊडर कोणती वापरली जाते याची चौकशी तपासणी पडताळणी केली जाते कां? पाणी विक्री करणारे हे सर्वजण परिस्थितीचे बळी आहेत यांची काय चूक नाही पण त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे आपल्या गावातील तालुक्यातील जिल्ह्यातील पाणी सप्लाय करणारे यांची संख्या व त्यांची तपासणी पडताळणी करुन दुषित पाणी वितरण करणारे यांच्यावर जनजीवन यास धोका उत्पन्न करणारे कृत्ये केली या अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात यावी
ग्रामपंचायत. नगरपालिका. महानगरपालिका. यांनी बाकीच्या पाण्याची चौकशी करण्यापेक्षा आपल्या पाणीपुरवठा विभागातील पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी कधी धुतली आहे? त्यात कोणती पाऊडर केमिकल पाणी शुद्धीकरण करतांना वापरले आहेत यांचे वृतमानपत्रात जाहीर करावे.
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 9 =