You are currently viewing वागदे, कसंवण- तळवडे, आब्रड रस्ता पावसाळ्यापूर्वी चालू करावा…

वागदे, कसंवण- तळवडे, आब्रड रस्ता पावसाळ्यापूर्वी चालू करावा…

भाजपाचे सा.बा. विभागाला निवेदन सादर

कणकवली

वागदे कसंवण तळवडे आब्रड रस्ता पावसाळ्यापूर्वी चालू करावायासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. जर हा रस्ता पावसापूर्वी पूर्णत्वास गेला नाही आणि वाहतूक सुरू झाली नाही तर भाजपा आंदोलन करेल असा इशारा यावेळी दिला.

प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे वागदे कसंवण तळवडे आब्रड रस्ता अडकला आहे त्याचे काम पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी चालू करावा यासाठी तालुका भाजप तर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देताना भाजपा कणकवली तालुका अध्यक्ष श्री मिलिंद मेस्त्री, भाजपा कणकवली शहराध्यक्ष श्री अण्णा कोदे, कसंवण तळवडे उपसरपंच श्री भाई सावंत, श्री प्रशांत सावंत,श्री यशोधन सरपे, श्री बंड्या मालांडकर, श्री कृष्णा गावकर, श्री अभय गावकर,श्री समीर प्रभूगावकर. आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा