You are currently viewing कणकवली शहरात उभी राहिली सुसज्ज अशी शौचालयाची इमारत

कणकवली शहरात उभी राहिली सुसज्ज अशी शौचालयाची इमारत

कणकवली शहरात उभी राहिली सुसज्ज अशी शौचालयाची इमारत.

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण

कणकवली

कणकवली नगरपंचायतीच्या वतीने आप्पासाहेब पटवर्धन चौकातील जुन्या भाजी मार्केट येथे नव्याने बांधण्यात आलेल्या आणि सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या शौचालयाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण करण्यात आले.

या उद्घाटनासाठी नगपंचायत चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतीतोष कंकाळ , भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष प्रज्ञा ढवण, तालुका अध्यक्ष मिलिंद मिस्त्री, भाजी मार्केटमधील व्यापारी राजेंद्र पेडणेकर युवक चे गणेश तळेगावकर,तसेच भाजी मार्केट मधील व्यापारी,दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कणकवली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले जुने शौचालय वापरण्यास योग्य नव्हते त्यामुळे नव्याने शौचालयाची निर्मिती करण्याचा निर्णय कणकवली नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या कारकिर्दीत घेण्यात आला होता. या शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते त्याचे फीत कापून जनतेसाठी खुले केले. त्यामुळे कणकवली बाजारपेठेत महत्वपूर्ण अशी सुविधा निर्माण झाली आहे.शहराच्या ठिकाणी बाथरूम अधिक शौचालय नसल्यामुळे बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांची गैरसोय होत होती.महिलांना तर असंख्य अडचणी येत होत्या. या सर्वांचा विचार करून आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेत हे शौचालय बांधण्यासाठी शासकीय निधी मिळवून दिला होता. ४८ लाख रुपये त्यासाठी निधी खर्च करून हे शौचालय ग्राउंड प्लस वन अशा पद्धतीने बांधण्यात आले आहे.याचे बांधकाम सुद्धा चांगल्या क्वालिटीचे असल्याचे पाहावयास मिळते.त्याबद्दल आमदार निलेश राणे यांनी गौरवोद्गार काढले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − 3 =