You are currently viewing भाजपा वेंगुर्ले च्या वतीने शरीरसौष्ठवपट्टु अंकित सोनसुरकर चा सत्कार

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने शरीरसौष्ठवपट्टु अंकित सोनसुरकर चा सत्कार

डिपार्टमेंट ऑफ स्पोटर्स अॅड फीजीकल एज्युकेशन , मुंबई विद्यापीठ आयोजित सि.के.टी.काॅलेज , पनवेल येथे झालेल्या आंतर विद्यापीठ बेस्ट फिजिक शरीरसौष्ठव स्पर्धेत डिपार्टमेंट ऑफ फिजिकल एज्युकेशनचा बी.पी.एड. प्रथम वर्षाचा विद्यार्थी व वेंगुर्लेतील शरीरसौष्ठवपट्टु अंकित किशोर सोनसुरकर याने ८० कीलो वजनी गटात तृतीय क्रमांक पटकावत सिंधुदुर्गचा पहीला खेळाडू बनन्याचा मान मिळवल्याबद्दल भाजपा वेंगुर्ले च्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला .
किशोर सोनसुरकर यांच्या सातेरी व्यायाम शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नगराध्यक्ष राजन गिरप व भाजपाचे प्रदेश का का सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते शाल , पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला .
यापूर्वीही अंकित सोनसुरकर याने ज्यु.मि.आशिया २०१७ स्पर्धेत बॅंकाॅक – थायलंड येथे ५ वा क्रमांक मिळविला , तसेच ज्यु.मि.आशिया २०१८ भोपळ – मध्यप्रदेश येथे सहभागी झाला. खर्डेकर श्री २०१८ स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेता , तसेच जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत प्राविण्य मिळवीले . पॉवरलिफ्टिंग खेळात राज्यस्तरीय मजल मारली तसेच वेटलिफ्टींग मध्ये जिल्हास्तरीय गोल्ड मेडल प्राप्त केले . तसेच आंतर मुंबई युनिव्हर्सिटी बेस्ट फिजिक ८० किलो वजनी गटात तिसरा क्रमांक मिळविला .
अशा स्पर्धा गाजवत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोनाच्या काळात सातेरी व्यामशाळेच्या वतीने ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ले येथे गरजु रुग्णांना ऑक्सिजन काॅन्सस्ट्रेटर ची अनमोल सेवा उपलब्ध करून देण्यात मोठा पुढाकार घेतला . अशा हरहुन्नरी खेळाडूचा सन्मान भाजपा वेंगुर्ले च्या वतीने करण्यात आला .
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , नगरसेवक प्रशांत आपटे , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , ता उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस , परबवाडा सरपंच पपु परब , किसान मोर्चा चे बाळु प्रभु , अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा , सांस्कृतिक आघाडी चे शैलेश जामदार ,बुथप्रमुख शेखर काणेकर , ओंकार चव्हाण तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू किशोर सोनसुरकर , व्यायामशाळा संचालीका सौ.अबोली सोन्सुरकर , राज्य पंच सुधीर हळदणकर , रांगोळीकार पिंटू कुडपकर , रस्सीखेच पंच मनोहर कावले , सिंधुदुर्ग श्री हेमंत चव्हाण , व्यायाम प्रशिक्षक निनाद दिपनाईक , गौतम परब , मोहीत कुमार , वैभव पेठे, साहील बागायतकर ,सोहन पोतदार ,अभि गावडे , हर्ष मोबारकर ,काझीटन डिसोझा , रॅमीज शेख , शुभम गावडे , विक्रांत मठकर , सॅमसंग फर्नांडिस इत्यादी व्यायामपट्टु उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा