You are currently viewing बांदा-नाबर स्कूल मधील शिक्षकांचा लोकमान्य सोसायटीकडून सन्मान….

बांदा-नाबर स्कूल मधील शिक्षकांचा लोकमान्य सोसायटीकडून सन्मान….

बांदा

संपूर्ण भारतात ५ सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. या निमित्ताने व्ही.एन.नाबर इग्लिश मिडीयम स्कूल मधील शिक्षकांना गुलाब पुष्प,सन्मान पत्र,देऊन लोकमान्य मल्टीपर्पज को.आँप सोसायटी लि. , बांदा शाखा यांच्या वतीने शाखाअधिकारी उमेश परब, यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शाखाअधिकारी उमेश परब, सर्वेश प्रभु, ज्ञानेश्वर येडवे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई, उपस्थित होत्या. बोलताना उमेश म्हणाले शिक्षक नेहमीच ज्ञानदानाचे पवित्र काम करत असतात. यातूनच आपल्या समाजातील विद्यार्थी घडत असतात. त्यामुळेच शिक्षक दिनाच्या निमित्ताने त्यांना आमच्या शाखेच्या वतीने आम्ही सन्मानित करत आहोत.यावेळी शिक्षिका शिल्पा कोरगावकर, हेलन राँड्रीक्स, रसिका वाटवे, चित्रलेखा नाईक, धनश्री मुंगी,प्रिती पेडणेकर, रिया देसाई, राकेश परब,हर्षद खडपकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + 1 =