You are currently viewing नवसाला पावतो…हाकेला धावतो….!

नवसाला पावतो…हाकेला धावतो….!

४८ खेड्यांचा श्री स्थापेश्वर….!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील १६कि.मि.अंतरावर वसलेले, छोटेस “डेगवे “गाव.बांदा शहरा पासून हाकेच्या अवघ्या ३ कि.मि.अंतरावर आहे, तर थंड हवेचे ठिकाण व पावसाळ्यात धबधब्याच्या ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या “आंबोली” पासून ३५ कि.मि अंतरावर हा गांव वसलेला आहे. तर नवनिर्वाचित असलेल्या, दोडामार्ग या तालुक्या पासून फक्त २५ कि.मि.अंतरावर आहे.

वेंगुर्ले तालुक्यातील; रेडी गावापासून ४० कि.मि.अंतरावर मध्यवर्ती असलेल्या ठिकाणी तर; गोवा पेडणे तालुक्या पासून १८ कि.मि.वर बांदा गोवा या पूर्वीच्या स्त्यावर “दिग्विजय” अर्थात “डेगवे” गाव आहे.

गावाच्या पुर्वेला पडवे माजगाव, मोरगाव या गावची सिमा तर पश्चिमेला बांद्याची बाजारपेठ आहे. गावच्या दक्षिणेकडे डिंगणे गाव तर उत्तरेला तांबुळी गाव आहे. गावाच्या चारही बाजूला हिरवेगार डोंगर पसरले आहेत. गावाच्या मध्यभागातून बांदा, दोडामार्ग गोवा हा रस्ता मोठ्या डौलाने जातो आहे.

या गावातील आंबेखणवाडी, फणसवाडी, जाभंळवाडी, बाजारवाडी, मोयझरवाडी, मिरेखणवाडी, वराडकरवाडी अश्या सात वाड्यांचा मिळून “डेगवे” गाव बनला आहे. दिड दोन मैलाच्या अंतरावर गाव पसरला आहे. जेमतेम अंदाजे सतराशे ते अठराशे लोक वस्तीचे हे छोटेशे डेगवे गाव आहे.

गावाच्या मध्यवर्ती “श्री माऊलीचे “मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरात, घाडवस, म्हारीगंण, चव्हाट्याचे मंदिर हि स्वतंत्र लहान ३ मंदिरे असून या गावातील पुर्वजांची “स्मृतीमंदिरे” आहेत.तसेच स्वतंत्र “भक्तनिवास’ बांधले आहे

गावात लिंगेश्वराचे मंदिर, श्री राम मंदिर शिवाय प्रत्येक वाडीत “ब्राह्मणीस्थळ” ही आहेत. श्री .माऊली मंदिर हे गावरहाटीचे प्रमुख ठिकाण आहे. त्यामुळे येथून गावाचे वार्षिक गांवरहाटीचे धार्मिक कार्यक्रम केले जातात.

४८ खेड्यांचा “श्री स्थापेश्वर देवस्थान”मुळे या गावाला तालुक्यात अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या देवस्थानात सावंतवाडी,दोडामार्ग तालुक्यातील पुढील गांवाचा समावेश आहे.

१) डेगवे २)तांबुळी३)बांदे ४)वाफोली ५)गाळेल ६)डिंगणे ७) नेतार्डे ८)डोंगरपाल ९) फोंड्ये १०) आडाळी ११) कळणे १२) सासोली १३) कुब्रंल १४) कोलझर १५) उगाडे १६) तळकट १७) झोळंबे १८)मोरगाव १९) पडवे २०) माजगांव २१) फुकेरी २२) विलवडे २३) संरबळे २४) कोनशी २५) भालावल २६) असनये २७)घारपी २८) वेर्ले २९)उपवडे ३०)उडेली ३१) दाभिल ३२)बावळाट ३३) पारपोली ३४)फणसवडे ३५)कुंभवडे ३६)खडपडे ३७)नेवली ३८) देवसु ३९) ओवुळये ४०) केसरी ४१)दाणोली ४२) सातुळी ४३) शिरशिंगे ४४)कलंबिस्त ४५) वाडी दाभणा ४६) वाडी डेगवे ४७)वाडी गाळेल ४८) वाडी खुदाळ हि गांवे आहेत.

श्री स्थापेश्वर मंदिर “दक्षिणाभिमुख” आहे. सदर मंदिरात “महालक्ष्मी” व “स्थापेश्वर ” देवततेची अडीच फुट उंचीची सुबक मुर्ती आहेत. श्री स्थापेश्वर मुर्तीच्या उजव्या हाती तलवार आहे; तर डाव्या हातात ढाल आहे. त्या सोबत असलेल्या “श्री महालक्ष्मी” मुर्तीला ४हात आहेत. सदर दोन्ही मुर्ती दक्षिणाभिमुख उभ्या आहेत. तर त्याच्यां बाजूला लागूनच एक चौथरा आहे. या चौथ-यावर वाघाची पावले असलेले पाषाण आहे. पुर्वी सदर मंदिर लहान होते. ते मंदिर मोठे बांधण्यात गावातील तसेच अन्य भाविक, हितचिंतक, दानशूर, ग्रामस्थ, चाकरमानी सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, परीसरातील जनता यांच्या सहकार्याने सदर मंदिराचे नवीन बांधकाम वेगाने प्रगती पथावर आहे. या मंदिराच्या जागेचा परीसर १एकर ५ गुंठे असूनही या मंदिर परिसरा भोवती दगडी कंपाऊंड घातले आहे. मंदिर परीसरात एक हायस्माक, लावला असून स्वतंत्र “भक्तनिवासाचे ” बांधकाम प्रगतीपथावर आहे. नजिकच्या काळात या मंदिर परिसरात विहीर बांधकामास सुरु होईल. मुख्य रस्त्यावर श्री स्थापेश्वर मंदिरा समोर भाविकासाठी शासनाने ” प्रवासी निवारा” शेड बांधली आहे. त्यामुळे प्रवाशांची व महाविद्यालयीन मुलांना त्याचा फायदा होत आहे.

अशा या श्री स्थापेश्वर, महालक्ष्मी देवस्थानाची वार्षिक जत्रा प्रतिवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील पहिल्या “सोमवारी” असते. या जत्रेला परीसरातील भाविकांची तुडूंब गर्दी असते. “नवसाला पावणारा,व हाकेला धावणारा”…! श्री स्थापेश्वर देव अशी मुंबई, कर्नाटक, सिंधुदुर्ग, गोवा, बेळगाव, पुणे, रत्नागिरी, कोकण परीसरातील भाविकांची अपार “श्रध्दा” आहे. या देवाला श्रीफळ अर्थात नारळ, केळी, साखर, पेढे, ठेवतात तर श्री.महालक्ष्मीची खणा, नारळाने ओटी भरतात. अभिषेक करतात. या मदिरात वार्षिक विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात.

शिवाय गुढीपाडवा दिवशी *लक्षदिप* कार्यक्रम साजरा केला जातो.परीसरातील लोक या “दिग्विजयी” गावाला स्थापेश्वराचा गाव असे हि म्हणतात.
सद्या सदर मंदिरातील मुर्ती असलेल्या गाभाऱ्याचे युध्द पातळीवर जिर्णोध्दाराचे काम सुरु आहे. त्या करीता दानशूर भाविकांनीआर्थिक सहकार्य करण्याची विनंती देवस्थान ट्रस्टने व ग्रामस्थानीं केली आहे

देणगी खालील नांवें बँकेत जमा करून आम्हाला सहकार्य करावे अशी नम्र विनंती आहे.

श्री देवी महालक्ष्मी,स्थापेश्वर मंदिर जिर्णोद्धार समिती,डेगवे.
बँक आँफ महाराष्ट्र,बांदा शाखा,ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग खाते क्रमांक 20161444727असून ifscodemahbooooo68 आहे
गुगल पे करीता खालील प्रमाणे
मोबाईल क्रमांक:-7588260921 आहे

सदर देणगी वरील बँकेत जमा करावी. आणि फोटो कॉपी इथे टाकावी, म्हणजे सदर देणगीची पावती बनविण्यात येईल.
सदर देणगीलाआयकर अधिनियम१९६१ अन्वये (80 g) मध्ये आयकारात सूट आहे.आपल्या देणगीतून उर्वरित मंदिराचे काम पुर्ण होईल. त्यामुळे सर्वांनी यथा शक्ती देणगी देऊन दातृत्वाचा लाँकडाऊनच्या काळात आदर्श घालावा. हि कळकळीची नम्र विनंती आहे. आपले सर्वांचे मनोरथ पूर्ण होवो. अशी श्री महालक्ष्मी,स्थापेश्वर चरणीं प्रार्थना आहे.

श्री उल्हास बाबाजी देसाई
कार्यकारी मंडळ
डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ, मुंबई

9869720936

टिप:मंदिर देणगी बाबत डेगवे ग्रामस्थ व हितचिंतक यांनी आँनलाइन देणगी पाठवित आहेत. त्या बध्दल मनापासून आभारी आहोत

श्रीमहालक्ष्मी,स्थापेश्वर मंदिर जिर्णोद्धार समिती, डेगवे, सावंतवाडी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 3 =