*भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश आंदोलन समिती उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र तथा माहिती अधिकार नियोजन समिती, सांगली जिल्हा संस्थापक-अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख*
*अंधश्रध्दा मनांचा खेळ*
आपल्या डोळ्यांना जे दिसत नाही. जे आपणास पटत नाही लोक म्हणतात म्हणून आपणं ते मानतो आणि त्यानुसार वागतो . फक्त आणि फक्त लोक आपल पूर्वज सांगतात म्हणून आपणं आपल्या मनावर बसवून घेतो त्याला अंधश्रद्धा असं म्हणलं जातं .
आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे यास अंधश्रद्धा असे म्हणतात. अंधश्रद्धेमध्ये विविध प्रकार आहेत. यामध्ये काळी जादू, तंत्र-मंत्र, जादूटोणा, नरबळी ,नजर टोक, तसेच भूत- प्रेत, पिशाच्च नजर लागणे, मांजर आडवं जाण, शिंक येणे, कावळा ओरडणे, टिटवी ओरडणे, कुत्री रडणे, लिंबू मिरची टाकणे, अंगात येणे, ज्योतिष विशारद, वास्तुशास्त्र, केरसुणी आडवी उभी ठेवणें, भुतं लागण, रात्री कचरा बाहेर टाकणे, रात्री नख काढणेे, अश्या विविध अंधश्रद्धा फिरविणारया गोष्टी वर आपणं भुलतो आणि आपलं मतं नसतांना सुध्दा यांवर आपणं विश्वास ठेवतो. या संबंधित अंधविश्वास, अफवा पसरवणे व कृती करणे तसेच या कृतींचाही इतर प्राणी जीवनावर विपरीत परिणाम होणे म्हणजेच.
व्हॅटिकनमध्ये ‘एक्सॉरसिजम’ नावाचा भूत उतरवण्याचा कोर्स शिकवला जातो. इ.स. २००५ साली सर्वप्रथम हा कोर्स सुरू करण्यात आला होता.
समाजातील अज्ञानाचा फायदा घेऊन विघातक वृत्तीकडून होणारे शोषण थांबविण्यासाठी महाराष्ट्राने २०१३ साली कठोर कायदा केला आहे. याचे संक्षिप्त नाव महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा, २०१३ असे आहे.
समाजात विविध जाती धर्माचे लोक. विविध विचार आचार असणारे लोक. विविध मानसिकता असणारे लोक. त्यातच पापी जगला लोकांना भुलथापा मारून लुटणारे लोक सुद्धा याचं समाजात असतांत. लोकांना चांगले विचार शिक्षण महत्व समजावून सांगून लोकांचे जीवन आनंदी चैतन्य मय करणारे लोक सुद्धा याचं समाजात असतांत . आपल्या मनाला समजूत घालण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो .
माणसाला भुतं लागत का? आपणं विचार केला तर जुनी लोक सांगतात भुतं दिसतं नाही. तयाला सवताची छाया नसते. आत्महत्या करणारे दुर्धर आजाराने मरण पावलेले लोक भुतं सैतान होतातच त्याचा आत्मा भटकत असतो. एवढी माहिती आपणांस कशी उपलब्ध झाली तुम्ही स्वःता बघितली आहे कां ? कुणीतरी सांगतं आणि आपणं आपणांस थंडी ताप, कणकणी, आली झोप लागत नाही, अपुरी झोप यामुळे आपणं रात्रीच उठून बसतो. ही सर्व शारीरिक व्याधी असतें पण आपणं याला वेगळं वळण देतो आणि ज्योतिष बघणारे. भुतं भानामती अश्या ढोंगी लोकांकडे जातो आणि गंडा दोरा, लिंबू, शाकाहारी, मांसाहारी उतारा हा ढोंगी सांगतो आणि आपणं डॉ कडे न जाता अश्या ढोंगी लोकांच्या नादाला लागतो आणि अंधश्रद्धेच्या माग धावतो आणि माझ्या नशिबाला आलं म्हणून नशिबाला दोष देत राहतो.
अंगात येणं कितपत खरं आहे मला कळतं नाही. आणि ते सुद्धा महिला मध्ये अंगात येण्याचे प्रमाण जास्त आहे. देवी आली देवी आली हळद कुंकू यांचा सडा टाकला जातो.अंगात आलेल्या देवीच्या तोंडातून येणार प्रत्येक शब्द म्हणजे गावांवर संकटं येईल गावात मृत्युचे तांडव होईल यासाठी गावच्या देवीला कोंबडं, बकर, नरबळी द्यावा लागेल असं तोंडातून आल की आपणं पैशांचा खर्चाचा विचार न करता फक्त आणि फक्त अंधश्रद्धा म्हणून लोक अशा फसव्या आशेच्या माग धावत असतात आणि आपले विचार आचार घाणवट केल्यासारखे वागतात. जमीनीत गुप्त धन आहे अशी बतावणी करणारे ज्योतिष शास्त्र वाले हे तर सर्वात मोठी अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करतात कारणं जमीनीतील गुप्त धन मिळविण्यासाठी नरबळी द्यावा लागेल. घुबड, महांमडुळ, कासव अशी विविध प्राणी यांचें जीव देण्याचा सल्ला दिला जातो. आत्ता मला सांगा प्राण्याचं आणि माणसांचा बळी दिल्यानं धन मिळतं असतं तर समाजातील सर्वजण श्रीमंत झाले असतें. आपल्या मनांत धनाची लालसा निर्माण करून अंधश्रद्धा घट्ट करण्याचे काम हेंच समाजातील लोक करत असतात.
मांजर आडवं जाणं, कावळा ओरडणे, टिटवी ओरडणे, कुत्र रडणं, शिंक येण, मांजर आपल्या किंवा गाडीच्या समोरून मांजर आडवं गेलतर आपणांस वाटतं की आज आपलं काम होणार नाही . ही अंधश्रद्धा माणसाच्या मनात घर करून बसलेली असते पण मांजर हे भक्ष शोधण्यासाठी ईकड तिकडे करत असतं त्यात तुमचं काम होणे अथवा न होणे याचा काय संबंध?
घरावर कावळ्याचे ओरडणं यांच्या माग आपली मानसिकता म्हणा अथवा अंधश्रद्धा म्हणा पाऊणा येतो.कुणाचा शुभ संदेश येतो. कुणाला वाईट वार्ता ऐकायला मिळते. हे खर नसणार आहे. कारणं जर चांगले वाईट कावळ्याला कळलं असतं तर त्या कावळयान गावांची घाण खाल्ली असती कां? आपल्या पेक्षा कावळा हुशार आहे आणि आपण मूर्ख आहोत अंधश्रद्धेला चिटकवून बसलेलो आहोत. टिटवी ओरडणे. कुत्र रडणं हे आपणं अशुभ माणतो कारणं यामुळे कोणाच्यातरी मृत्यू होतो किंवा मृत्युचा संदेश येतो अशी आपली मानसिकता आहे किंवा अंधश्रद्धा आहे असं म्हणा. कारणं टिटवी तीची अंडी सापडतं नाहीत म्हणून रात्री ओरडत असते. कुत्र्याच्या जेव्हा पोटात दुखायला लागतं तेव्हा कुत्रीच काय पण माणसं सुध्दा रडतात मग त्यात काय अशुभ असतं.
अशा विविध माध्यमातून आपल्या मनात अंधश्रद्धा घरं करून बसली आहे त्यामुळे आपणं तेच बघतो जे आपणांस दाखविले जाते. आज अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन स़बोधन करण्यासाठी विविध सामाजिक स़घटना समाजसेवक, समाजात सतर्कता आणण्यासाठी रा़त्र दिवस प्रयत्न करतं आहेत. समाजातील काही समाजकंटक यांनी अश्या लोकांना गोळ्या घातल्या. घरांत घुसून माराहान केली. काही जणांना गायब केले. तरिसुधदा समाजसेवक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य यांचा समाज सुधारणा करण्याचा विश्वास दृढ केला आहे.
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९