You are currently viewing भाजपा युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस शेकडो दिंव्यागाच्या उपस्थित साजरा..

भाजपा युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस शेकडो दिंव्यागाच्या उपस्थित साजरा..

कसाल :

भाजपा युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस विवीध उपक्रम हाती घेऊन जिल्हाभरात साजरा होत असताना. आज कसाल मध्ये शेकडो दिंव्यागांच्या सोबत केक कापून साजरा करण्यात आला.

जागतिक पांढरी काठी दिनानिमीत्त भाजपा दिंव्याग विकास आघाडी च्या वतीने कसाल येथील सिद्धिविनायक हाॅल मध्ये दिव्यांगांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात विशाल परब यांच्या हस्ते अंधांना पांढरी काठीचे वाटप करण्यात आले. तसेच सर्व दिव्यांगांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस उस्ताहात साजरा करण्यात आला.

यावेळी दिव्यांगांना मार्गदर्शन करताना विशाल परब म्हणाले की भविष्यात दिव्यांगांना कोणतीही अडचण आली तर आपण मदत करू. तसेच केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या  माध्यमातून खादी ग्रामोद्योग विभागामार्फत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच भविष्यात दिव्यांगांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, भाजपा दिंव्याग विकास आघाडी जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे, जिल्हा सरचिटणीस शामसुंदर लोट, चिटनीस सुनील तांबे, दिक्षा तेली, स्वाती राऊळ, संगीता पवार, रविंद्र शिरसाठ तसेच जिल्ह्यातील २२५ दिंव्याग उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा