You are currently viewing मृग धावला…

मृग धावला…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी शशांक देशमुख लिखित अप्रतिम हायकू रचना*

 

*”मृग धावला…”*

 

घन सावळे

क्रुद्ध भानू विरला

ग्रीष्म सरला

 

शीतल वारा

अवचित पाऊस

अंगी शहारा

 

मृग धावला

वसुंधरा हसली

पाऊस आला

 

भिजली माती

मृदगंध दाटला

बळी हर्षला

 

बळी धजला

धुरळ पेरणीला

नभात डोळा

 

✍️शशांक दिनकरराव देशमुख©®

चांदुरबाजार, जि. अमरावती

(महाराष्ट्र राज्य) – ४४४ ७०४

मो. क्र. ९९२३५३६३२५

प्रतिक्रिया व्यक्त करा