You are currently viewing आ. नितेश राणे कणकवली वैभववाडी अवैध धंद्याबाबत गप्प का?

आ. नितेश राणे कणकवली वैभववाडी अवैध धंद्याबाबत गप्प का?

गृहमंत्री, पालकमंत्री राज्यातील सत्ता असूनही पोलीसांविरोधात आंदोलन हे दुर्दैवी: परशुराम उपरकर

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नूतन एसपी अग्रवाल यांची मनसे शिष्टमंडळाने भेट घेत जिल्ह्यातील अंमली पदार्थ तसेच अवैध धंद्याबाबत कारवाई करण्यासाठी निवेदन दिले आहे. मात्र आमदार नितेश राणे यांना केवळ देवगड जामसंडे या दोन गावातीलच अवैध धंदे दिसतात. त्यांच्या मतदारसंघातील अन्य दोन तालुक्यांतील अवैध धंदे दिसत नाहीत का ? असा परखड सवाल मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी व्यक्त केला.

कणकवली तालुक्यातील ज्या माजी सरपंचाची गाडी अवैध दारू नेताना आज पकडली गेली तो कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे ? गृहमंत्री, पालकमंत्री स्वतःच्या पक्षाचे असूनही राज्यातील सत्ताधारी पक्षाचे आमदार असलेल्या आमदार नितेश राणेंना अवैध धंद्यांमुळे पोलीसांविरोधात आंदोलन करण्याची भाषा शोभत नाही अशी टीकाही उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

दारू, मटका आणि अंमली पदार्थांमुळे अनेक तरुणांनी जिल्ह्यात आत्महत्या केल्या आहेत. जिल्ह्यात अंमली पदार्थ तसेच अवैध धंद्यात कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते असले तरीही युवा पिढी बरबाद करणाऱ्या या बेकायदेशीर धंद्यांना कोणत्याही राजकीय पदाधिकाऱ्यांनी पाठीशी घालू नये असे आवाहनही उपरकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + eleven =