You are currently viewing ज्ञान, विज्ञान आणि प्रज्ञान..

ज्ञान, विज्ञान आणि प्रज्ञान..

*ज्ञान,विज्ञान आणि प्रज्ञान या तीनही गोष्टी जीवनाला अत्यंत आवश्यक आहेत.* याची जाणीव बहुतेक लोकांना नसते.ज्ञान, विज्ञान आणि प्रज्ञान यांचे प्रांतच वेगवेगळे आहेत हे प्रथम ध्यानात घेतले पाहिजे.ज्ञान (Information) हे जीवनातील प्रापंचिक अंग सांभाळण्यासाठी उपयुक्त असते.याचाच अर्थ असा की,ज्ञान (Information) नसेल तर माणसाचा संसार सुरळीत चालणार नाही.प्रत्येक गोष्ट करण्यासाठी किंवा साधण्यासाठी ज्ञान आवश्यक असते.ज्याला आपण विज्ञान (Material Science) असे म्हणतो ते विज्ञान अधिभौतिक उत्कर्ष (Material Development)

साधण्यासाठी फार आवश्यक आहे.विज्ञानाने आज जी प्रचंड प्रगती केलेली आहे ती सर्वश्रुत आहे.विज्ञानाची कास धरल्याशिवाय जीवनात प्रगती तर होणार नाहीच,पण जीवन संघर्षात माणसाला व राष्ट्राला तग सुद्धा धरता येणार नाही. *देशाचा उत्कर्ष साधण्यासाठी व देशाचे स्वातंत्र्य राखण्यासाठी विज्ञानाची कास धरायलाच पाहिजे.त्याचप्रमाणे हेही लक्षात ठेवले पाहिजे की,विज्ञान आधिभौतिक प्रगती साधण्यास जसे कारणीभूत ठरते तसे ते जगाचा संपूर्ण नाश करण्यास सुद्धा कारण होऊ शकते.त्याचप्रमाणे विज्ञानाने जी प्रगती साधलेली आहे,त्याचा जास्तीत जास्त फायदा श्रीमंतांना होतो आणि गरीबांचे प्रश्न मात्र प्रामुख्याने तसेच चिघळत रहातात.थोडक्यात,कितीही ज्ञान (Information) संपादन केले किंवा विज्ञानाने (Material Science) कितीही घौडदौड केली तरी मानवजात सुखी होणे कदापी शक्य नाही.कारण मानवाला सुखी करण्याचे सामर्थ्य ज्ञानात आणि विज्ञानात नाही.माणसाची आंतरीक उन्नती (Inner Development) झाल्याशिवाय माणसाला सुखाच्या दिशेने झेप घेता येणे शक्यच नाही.ज्याला आपण प्रज्ञान असे म्हणतो त्या प्रज्ञानात मानवाला सुखी करण्याचे सामर्थ्य आहे.जीवनविद्या प्रज्ञानाला ‘Science of Consciousness’ असे संबोधिते.बहिर्मन,अंतर्मन,अमन,शुद्ध मन आणि दिव्य मन (Conscious mind,Sub-conscious mind,Unconscious power,Pure consciousness and Divine consciousness) असे जाणीवेचे जे पांच प्रकार आहेत,हे जाणीवेचे पांच प्रकार प्रज्ञानाच्या कक्षेत येतात. बहिर्मनाला स्थिरता आणून,अंतर्मनाची जडण-घडण योग्य प्रकाराने व दिशेने* *बदलत बदलत मनाने दिव्य जाणीवेच्या दिशेकडे झेप घेणे अत्यंत आवश्यक आहे.कारण मानवाला सुखी करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.म्हणूनच परमार्थ जीवनाला आवश्यक आहे.*

🙏~सद्गुरु श्री वामनराव पै.🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा